Uff ...! पती विराट कोहलीच्या ‘ब्युटी’वर अनुष्का शर्मा फिदा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:14 PM2019-01-25T15:14:34+5:302019-01-25T15:18:11+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहलीसोबत न्यूझीलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. येथील एकमेकांसोबतच्या निवांत क्षणांचे अनेक फोटो विराट व अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या फोटोंनी इंटरनेटवर धूम केली असताना, आता एक नवा फोटो समोर आला आहे.

Uff ...! anushka sharma cant handle husband virat kohli beauty | Uff ...! पती विराट कोहलीच्या ‘ब्युटी’वर अनुष्का शर्मा फिदा!!

Uff ...! पती विराट कोहलीच्या ‘ब्युटी’वर अनुष्का शर्मा फिदा!!

googlenewsNext
ठळक मुद्दे होय, अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोला अनुष्काने दिलेले कॅप्शन सध्या लक्ष वेधून घेतेय.

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहलीसोबत न्यूझीलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. येथील एकमेकांसोबतच्या निवांत क्षणांचे अनेक फोटो विराट व अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या फोटोंनी इंटरनेटवर धूम केली असताना, आता एक नवा फोटो समोर आला आहे. या फोटोची खास बात म्हणजे, नेहमी पत्नी अनुष्काची तोंडभर स्तूती करणारा विराट यावेळी स्वत: प्रशंसा मिळवतोय.

होय, अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोला अनुष्काने दिलेले कॅप्शन सध्या लक्ष वेधून घेतेय.  Uff can’t handle this beauty, असे अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


‘तिच्यासोबतचे क्षण...’ असे लिहित विराटनेही अनुष्कासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत विरूष्का कमालीचे आनंदी दिसत आहेत, त्यांच्या चेहºयावरचा आनंद सहज टीपता येण्यासारखा आहे. एकंदर काय तर अनुष्का व विराट अगदी ‘मेड फॉर इच अदर’ कपल आहे. काय म्हणता? 
विराट व अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. या लग्नाला केवळ अनुष्का व विराटचे कुटुंबीय व अतिशय जवळचे मित्रमंडळीचं तेवढे उपस्थित होते. लग्नानंतर दोघांनीही मुंबईत एक रिसेप्शन दिले होते. 


 आॅस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अनुष्का शर्मा विराट व टीम इंडियासोबत सिडनीच्या मैदानात दिसली होती. अनुष्काच्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर अलीकडे ती शाहरूख खानच्या ‘झिरो’मध्ये दिसली होती. अर्थात हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही.

Web Title: Uff ...! anushka sharma cant handle husband virat kohli beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.