The two close friends of Bollywood were killed on the same date | ​बॉलिवूडमधील या दोन घनिष्ठ मित्रांचे एकाच तारखेला झाले होते निधन

फिरोज खान आणि विनोद खन्ना हे दोघे एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. त्या दोघांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूडमध्ये प्रचंड फेमस आहेत. द्यावान, कुर्बानी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना त्यांना एकत्र पाहायला मिळाले होते. त्यांची मैत्री आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील टिकली होती असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण विनोद खन्ना आणि फिरोज खान यांचे निधन एकाच तारखेला झाले होते. २७ एप्रिल या तारखेलाच त्या दोघांनी त्या जगाचा निरोप घेतला. फिरोज खान यांचे निधन २००९ ला तर विनोद खन्ना यांचे निधन या वर्षी म्हणजेच २०१७ला झाले.

vinod khanna firoz khan


फिरोज खान यांचा जन्म २४ सप्टेंबरला बेंगलुरू मध्ये झाला होता. ते एका पठाण कुटुंबातील होते. अफगाणास्तानमधून विस्थापित झालेले त्यांचे कुटुंब होते. त्यांची आई इराणी होती. एक दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना पाच भाऊ तर एक बहिण होती. फिरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांच्यासाठी या क्षेत्राचा प्रवास सुककर नव्हता. याच क्षेत्रात करियर करायचा हा विचार करून ते मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर दीदी या चित्रपटात त्यांना सहकलाकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी टारजन गोज टु इंडिया या इंग्रजी चित्रपटात काम केले. पण त्यांना अभिनय क्षेत्रात तितकेसे यश मिळत नव्हते. जवळजवळ पाच वर्षांनी त्यांना एक हिट चित्रपट मिळाला. पण या चित्रपटातही ते मुख्य भूमिकेत नव्हते. उंचे लोग हा तो चित्रपट असून त्यात राज कुमार आणि अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर आदमी आणि इन्सान या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला. अभिनयानंतर ते चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले. अपराध या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आणि या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत देखील झळकले. 

Also Read : ‘या’ व्यक्तीमुळे दामिनी मीनाक्षीने बॉलिवूडला केला कायमचा अलविदा !
Web Title: The two close friends of Bollywood were killed on the same date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.