Two actresses will be seen in 'India' with Salman! | ​‘भारत’मध्ये सलमानसोबत दिसणार ‘या’ दोन अभिनेत्री!!

सलमान खानचा नवा चित्रपट ‘भारत’ची घोषणा झाली आणि चर्चांना उधाण आले. चित्रपटाची कथा काय असेल इथपासून याच्या स्टारकास्टपर्यंत सगळ्यांचीच चर्चा रंगली. सलमानच्या अपोझिट कोण दिसणार याचीही चर्चा झाली. आधी सलमानच्या अपोझिट प्रियांका चोप्राचे नाव समोर आले. पण काही दिवसानंतर प्रियांका या चित्रपटात नसणार, अशी बातमी आली. पाठोपाठ प्रियांकाची जागा कॅटरिना कैफने घेतल्याचेही कानावर आले. मग बातमी आली ती कॅटच्या नकाराची. होय, कॅटने या चित्रपटाला नकार दिल्याचे कळले. कॅटच्या नकारानंतर पुन्हा प्रियांकाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. या सर्व चर्चांनी लोकांचा गोंधळ उडवला नसेल तर नवल. याच गोंधळात आणखी एक नवी बातमी कानावर येतेय. होय, ‘भारत’मध्ये कॅट वा प्रियांका यापैकी कुणी एक नसून दोघीही आहेत, हीच ती बातमी आहे. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी प्रियांका व कॅटरिना दोघींची नावे फायनल करण्यात आली आहेत. दोघींच्याही यात वेगवेगळ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिका असतील. आता या बातमीत खरेच तथ्य असेल तर चाहत्यांसाठी ही पर्वणी म्हणायला हवी.
असे झाले तर प्रियांका व कॅटरिना पहिल्यांदा एकत्र काम करतील.   प्रियांका व सलमान हे दोघे सुद्धा सुमारे दशकभरानंतर एकत्र स्क्रीन शेअर करतील. यापूर्वी सलमान व प्रियांकाने ‘सलाम ए इश्क’मध्ये एकत्र काम केले आहे.

ALSO READ : अट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान खानचे नाव; या वेबसाइटवर आहे संपूर्ण कुंडली!

‘भारत’मध्ये ५२ वर्षांचा सलमान खान १८ वर्षांचा दिसेल, अशीही चर्चा आहे. यासाठी एका खास तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. होय, ऐज रिडक्शन टेक्निक यासाठी वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. म्हणजेच सलमानला पुन्हा एकदा जिममध्ये घाम गाळावा लागून कडक डाएट फॉलो करावे लागेल.
Web Title: Two actresses will be seen in 'India' with Salman!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.