Twinkle Khanna told the shopkeeper Rs 280; What exactly is the read! | ट्विंकल खन्नाने २८० रुपयांवरून दुकानदाराला सुनावले; वाचा नेमका काय आहे किस्सा!

प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असते. भलेही ती सध्या चित्रपटांमध्ये बघावयास मिळत नसली तरी, तिचा बॉलिवूडमधील प्रवास पाहता तिचे स्टारडम अजूनही कायम आहे. बॉबी देओल स्टारर ‘बरसात’मध्ये भोळीभाबडी दिसणारी ट्विंकल वास्तवात मात्र खूपच अ‍ॅग्रेसिव्ह आहे. स्तंभलेखक, निर्माता आणि दोन-दोन पुस्तकांची लेखिका असलेल्या ट्विंकलचा राग जणूकाही तिच्या नाकावरच आहे. कारण ती कधी कोणावर संतापणार याचा काही नेम नसतो. आज आम्ही ट्विंकलच्या याच रागीट स्वभावाशी संबंधित एक किस्सा तुम्हाला सांगणार आहे. होय, एकदा ट्विंकल एका टॉय शॉपकिपरवर अशी काही संतापली होती की, सगळेच अवाक् झाले होते. त्या शॉपकिपरने मुलांकडून पैसे न घेताच त्यांच्या हातात खेळणी दिली होती. हीच बाब ट्विंकलला खटकली. तिने त्याला यावरून चांगलेच खडेबोल सुनावले.

वास्तविक ही घटना २००७ सालातील आहे. जेव्हा ट्विंकल मुंबईतील जुहू येथील एका मेटल टॉय कंपनीजवळ उभी होती. याचदरम्यान कंपनीत एक चार वर्षांचा मुलगा आला अन् खेळण्यांविषयी संबंधित शॉपकिपरला विचारू लागला. शॉपकिपरने त्या मुलाला विचारले की, तुला कोणते खेळणे आवडले? तर त्या मुलाने बबल टॉय आवडल्याचे सांगितले. शॉपकिपरने त्या मुलाकडून कुठलेही पैसे न घेता त्याला तसेच बबल टॉय देऊन टाकले. मुलगा त्याच्याशी खेळत निघून गेला. 

काही वेळानंतर ट्विंकल खन्ना त्याठिकाणी आली अन् शॉपकिपरवर प्रचंड संतापली. तिने शॉपकिपरला म्हटले, ‘तू ज्या मुलाला हे खळणे दिले त्याची किंमत काय होती?’ शॉपकिपरने त्या खेळण्याची किंमत २८० रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र ट्विंकलचा पारा चांगलाच वाढला. तिने त्या शॉपकिपरला खडेबोल सुनावताना म्हटले की, ‘एवढे रुपये कमविण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुला माहिती आहे काय? ट्विंकलच्या या प्रश्नावर शॉपकिपर निरुत्तर झाला. त्याने खाली मान घालून ट्विंकलचा संपूर्ण राग सहन केला. 
Web Title: Twinkle Khanna told the shopkeeper Rs 280; What exactly is the read!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.