Twinkle Khanna killed seven mosquitoes in the plane! People enjoyed it !! | ट्विंकल खन्नाने विमानात मारले सात डास! लोकांनी घेतली अशी मजा!!

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतो. ट्विंकल पुन्हा एकदा याच कारणाने चर्चेत आलीयं. होय, ट्विंकलने अलीकडे एक  ट्विट्स केले आणि  तिच्या या ट्विट्सनंतर युजर्सनी ट्विंकल व अक्षय कुमारची चांगलीच मजा घेतली. आता ट्विंकलने केलेले हे  ट्विट्स कशाबद्दल होते, हे माहित करून घ्यायलाच हवे. 


ट्विंकलचे  ट्विट्स होते, विमानातील प्रवासातील गैरसोयीबद्दल. ‘मुंबईहून टेकआॅफ करणारे विमान...जीवनरक्षक गोष्टींऐवजी कृपया सीटखाली ओडोमॉस ठेवा. आत्ता आत्ता ७ डास मारलेत. डुंबण्यापेक्षा डेंग्यूने मरण्याचा अधिक धोका आहे,’असे  ट्विट्स तिने केले. ट्विंकलच्या या पोस्टनंतर लोकांनी कमेंट्स करणे सुरू केले. अनेकांनी यावरून ट्विंकलची मजा घेतली. एका युजरने तर मजा घेताना ट्विंकलचा पती अक्षय कुमार यालाही यात गोवले.


‘तुझ्या नॅशनलिस्ट पतीला आता या विषयावरही चित्रपट बनवायला सांग,’ असे या युजरने लिहिले. अन्य एका युजरने ‘तुझे स्वत:चे ओडोमास घेऊन जात जा,’ असे लिहिले. आणखी दुस-या युजरने ‘आपके सात खून माफ, अब आप और क्या एक्सपेक्ट करती है एअरलाईन्स से’ असे लिहून ट्विंकलची मजा घेतली. काहीजण तिला सल्लाही देताना दिसले. ट्विंकल तू आपल्या पोस्टमध्ये एअरलाईन्सचे नावही लिहायला हवे होते,असे काहींनी तिला सुचवले.

ALSO READ : ट्विंकल खन्ना म्हणते, सोशल मीडियावरचे ट्रोलर्स हे झुरळांसारखे...!!

अर्थात या सगळ्या ट्रोलिंगचा ट्विंकलवर काही परिणाम होईल, याची शक्यता कमीचं आहे. कारण ट्रोलर्सला ट्विंकल जराही भाव देत नाही. अगदी अलीकडे ट्विंकलने ट्रोलर्सची तुलना झुरळांशी केली होती.होय, सोशल मीडियावरचे ट्रोलर्स म्हणजे, झुरळाची प्रजाती आहे, असे तिने म्हटले होते. प्रत्येकाची खिल्ली उडवणे या लोकांना (ट्रोलर्स) अतिशय आवडते. तुम्ही त्यांची खिल्ली जितकी गंभीरपणे घ्याल, तितका त्यांना तेव चढतो.  त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणे मी मूर्खपणा मानते. ट्रोलर्सची ही जमात झुरळासारखी असते. स्प्रे मारला की ते लगेच रस्त्यातून नाहीसे होतात. त्यामुळे ही झुरळं दूर करायची असतील तर त्यावर स्प्रे मारत राहावे लागेल, असे  ट्विंकल म्हणाली होती.

Web Title: Twinkle Khanna killed seven mosquitoes in the plane! People enjoyed it !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.