लग्नाच्या वाढदिवसालाच अक्षय कुमारला पडला बायकोचा ‘पंच’ ; पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:33 AM2019-01-18T10:33:28+5:302019-01-18T10:34:59+5:30

काल १७ जानेवारीला अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांनी आपल्या लग्नाचा १८ वा वाढदिवस साजरा केला. या मुहूर्तावर अक्षय व ट्विंकल दोघांनीही सोशल अकाऊंटवर मजेशीर पोस्ट केल्यात. यातली अक्षयची पोस्टवर जाम मजेशीर आहे.

twinkle khanna did boxing with akshay kumar on 18th wedding anniversary | लग्नाच्या वाढदिवसालाच अक्षय कुमारला पडला बायकोचा ‘पंच’ ; पाहा व्हिडिओ!!

लग्नाच्या वाढदिवसालाच अक्षय कुमारला पडला बायकोचा ‘पंच’ ; पाहा व्हिडिओ!!

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षय व ट्विंकल हे बॉलिवूडचे आदर्श जोडपे मानले जाते. दोघांनाही आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. आरव विदेशात शिकतो आहे तर नितारा अद्याप बरीच लहान आहे.

काल १७ जानेवारीला अक्षय कुमारट्विंकल खन्ना यांनी आपल्या लग्नाचा १८ वा वाढदिवस साजरा केला. या मुहूर्तावर अक्षय व ट्विंकल दोघांनीही सोशल अकाऊंटवर मजेशीर पोस्ट केल्यात. यातली अक्षयची पोस्टवर जाम मजेशीर आहे. लग्नाच्या वाढदिवसाला अक्षयला काय मिळावे, तर बायकोकडून मार. होय, काल रात्री अक्षय व ट्विंकलने आपल्या जवळच्या मित्रांसाठी डिनर पार्टी ठेवली. एकीकडे ही डिनर पार्टी रंगात आली असतानाच दुसरीकडे ट्विंकलआणि अक्की यांच्यात बॉक्सिंगचा सामना रंगला. होय, मग काय, अक्कीची चांगलाच मार पडला. 




अक्कीने या क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘जेव्हा तुमच्या घरात मार्शल आर्ट इंथियोजास्ट तुम्हाला मुव्ह करायला शिकवते...पंचिंग बॅगच्या जागी तुम्हालाच पंच मारते... आमची १८ वर्षे काहीशी अशीच होती. या वर्षांत आम्ही खूप काही श्किलो. एकमेकांना अनेक सरप्राईज दिलेत...’, असे अक्षयने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले.


अक्षय व ट्विंकल हे बॉलिवूडचे आदर्श जोडपे मानले जाते. दोघांनाही आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. आरव विदेशात शिकतो आहे तर नितारा अद्याप बरीच लहान आहे. अक्षय व ट्विंकलच्या करिअरबद्दल बोलायचे तर ट्विंकलने कधीच अभिनयाला रामराम ठोकला आहे. ‘मेला’सारखा सुपर फ्लॉप सिनेमा दिल्यानंतर तिने अभिनय सोडणेचं योग्य समजले आणि लेखिका बनण्याचा निर्णय घेतला. याऊलट अक्षय गत २५ वर्षांपासून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. गेल्या काही वर्षांपासून अक्षय बॉलिवूडचा नंबर १ चा अभिनेता आहे. हे वर्षही त्याच्याच नावावर असणार आहे. या वर्षांत अक्षयचे एकापाठोपाठ एक असे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Web Title: twinkle khanna did boxing with akshay kumar on 18th wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.