TV star Sumit Vyas's luck turned out! Kareena Kapoor will be working with the legendary actress! | ​ टीव्ही स्टार सुमीत व्यासचे नशीब फळफळले! करिना कपूरपाठोपाठ ‘या’ दिग्गज अभिनेत्रीसोबत करणार काम !

छोट्या पडद्यावरचा एक लोकप्रिय चेहरा सुमीत व्यास याचे नशीब फळफळले, असेच म्हणता येईल. होय, कारण तसे नसते तर एकापाठोपाठ एक अशा दोन आघाडीच्या अभिनेत्रींसोबत दोन मोठ्ठे सिनेमे सुमीतच्या हाती लागले नसते. सुमीत व्यास लवकरच शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात दिसणार आहे. सुमीत या चित्रपटात करिना कपूरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर आता सुमीतला बॉलिवूडच्या आणखी एका मोठ्या अभिनेत्रीसोबत चित्रपट मिळाला आहे. होय, ही अभिनेत्री कोण तर कंगना राणौत.दिग्दर्शक शैलेन्द्र सिंह यांनी सुमीतला साईन केले आहे. या थ्रीलर चित्रपटात कंगना राणौत लीड रोलमध्ये आहे. तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे शूटींग संपताच कंगना शैलेन्द्र सिंह यांच्या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. 
सुमीत व्यास मुळात थिएटर आर्टिस्ट आहे. १६ व्या वर्षांपासून सुमीतने राज बब्बर यांच्या पत्नी नदिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रूपसोबत काम करणे सुरू केले. २००७ मध्ये सुजीत सरकारने दिग्दर्शित केलेली एका जाहिरातील सुमीतला संधी मिळाली.  यानंतर तो अनेक टीव्ही मालिकेत दिसला. ‘परमनंट रूममेट्स’ ही त्याची वेबसीरिज प्रचंड गाजली. पुढे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘औरंगजेब’, ‘सबकी बजेगी बँड’, ‘गुड्डू की गन’, ‘रिबन’ असे अनेक चित्रपट त्याने केले.  आता सुमीतला आघाडीच्या अभिनेत्रींसोबत चित्रपट मिळताहेत.
‘वीरे दी वेडिंग’मध्ये सुमीत करिनासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात सुमीत लीड रोलमध्ये आहे. मुलाच्या जन्मानंतर करिनाचा हा पहिला चित्रपट असल्याने सगळ्यांच्या नजरा या चित्रपटाकडे लागल्या आहेत. याशिवाय यातील करिना व सुमीतची आॅनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगते, याबद्दलही प्रेक्षकांत उत्सुकता आहे.
Web Title: TV star Sumit Vyas's luck turned out! Kareena Kapoor will be working with the legendary actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.