Trolled: Fatima Sana Sheikh's 'Shameless Selfie' brought angry people! Read detailed !! | Trolled: ​फातिमा सना शेखच्या ‘शेमलेस सेल्फी’ने आणला लोकांना राग! वाचा सविस्तर!!

‘दंगल’ चित्रपटानंतर नावारूपास आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख आमिर खानसोबत  ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’’मध्ये दिसणार आहे. अर्थात त्याआधीच फातिमा चर्चेत आली आहे. चर्चेत का तर एका सेल्फीमुळे. होय, एक ‘शेमलेस सेल्फी’ शेअर करणे फातिमाला महागात पडलेय. या सेल्फीवरून फातिमाला ट्रोल व्हावे लागलेय. आता हे ‘शेमलेस सेल्फी’ काय प्रकरण आहे तर तेच जाणून घेऊ यात.
 


फातिमाने तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक सेल्फी पोस्ट केला होता. यात फातिमा साडीत दिसतेय. अर्थात फातिमाचा साडी नेसण्याची त-हा जरा अजब दिसतेय. आता हा फोटो पोस्ट केला तो केला. पण या फोटोला फातिमाने एक वादग्रस्त कॅप्शन दिले. कॅप्शन काय तर ‘शेमलेस सेल्फी’. मग काय? या ‘शेमलेस’ प्रकरणावरून युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. लोकांनी तिला अतिशय आक्षेपार्ह भाषेत कमेंट्स दिलेत. ‘फातिमा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ असे एका युजरने लिहिले. दुस-याने थेट फातिमाच्या साडीवर कमेंट्स केलेत. ‘तुला साडी नेसता येत नसेल तर नेसू नकोस. पण या पोशाखाचा आणि मर्यादेचा असा अपमान तर करू नकोस,’ असे दुसºयाने लिहिले. अद्याप फातिमा यावर काहीही बोललेली नाही. अर्थात ट्रोल होण्याची ही तिची पहिली वेळ नाहीच. याआधी सुद्धा फातिमाला ट्रोल व्हावे लागलेय. यापूर्वी तिने रमझानच्या पवित्र महिन्यात स्वत:चा एक बिकनी फोटो शेअर केला होता. यावरून मोठा वाद उठला होता. या फोटोवरून अनेक युजर्सनी फातिमाला फैलावर घेतले होते.

ALSO READ : shocking !! फातिमा सना शेखमुळे आमिर खान व किरण रावच्या संसारात धुसफूस?

फातिमा ही आमिरची आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळेच ‘दंगल’ नंतर आमिरने तिला आपल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कास्ट केले. ‘दंगल’मध्ये आमिर व फातिमा या दोघांनी बाप-लेकीची भूमिका साकारली होती. पण आता ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिर व फातिमा दोघेही कथितरित्या एकमेकांशी रोमान्स करताना दिसणार आहेत. अलीकडे फातिमाने यावर अगदी बिनधास्त उत्तरही दिले होते. एका चित्रपटात मी आमिरची मुलगी झाली असले आणि दुस-याच चित्रपटात मला त्याच्यासोबत रोमान्स करायचा असल्यास, मला काहीही आक्षेप नाही. मी एक कलाकार आहे आणि माज्या वाट्याला ज्या भूमिका येतील, त्या करायला मला आवडेल, असे ती म्हणाली होती.
Web Title: Trolled: Fatima Sana Sheikh's 'Shameless Selfie' brought angry people! Read detailed !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.