TRAILER OUT: 'Budhia Singh' | TRAILER OUT: ​‘बुधिया सिंग’

जगातील वयाने सर्वात लहान मॅरेथॉन धावपटू म्हणून एकेकाळी संपूर्ण जगात प्रसिद्धी पावलेल्या बुधिया सिंगच्या जीवनावर आधारित  ‘बुधिया सिंग - बॉर्न टू रन’ या चित्रपटाचे ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाले आहे.

सौमेंद्रा पाधी दिग्दर्शित या सिनेमात मनोज वाजपेयी प्रशिक्षक बिरांची दासच्या भूमिकेत असून बालकलाकार मयूरने बुधिया सिंगचे पात्र साकारले आहे.

ओडिसामध्ये जन्मलेल्या बुधियाने २००६ मध्ये वयाच्या केवळ चौथ्या वर्षी भुवनेश्वर ते पुरी असे ७० किमी अंतर केवळ सात तास आणि दोन मिनिटांत पूर्ण केले होते.

लिमका बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये सर्वात तरुण मॅरेथॉन धावपटूचा विक्रम त्याच्या नावे नोंदविला गेला आहे. 

अशा या ‘वंडर बॉय’ची कथा रुपेरी पडद्यावर या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे हालाखीच्या परिस्थितीमुळे बुधियाच्या आईने त्याला तो दोन वर्षांचा असताना एका सेल्समनला  केवळ ८०० रुपयांत विकले. मग बिरांची दासने त्याला आपल्या घरी ठेवून धावण्याचे कठोर प्रशिक्षण दिले.

एकीकडे बुधियाची धावण्याची असामान्य क्षमता आणि तीची परिसीमा गाठण्यासाठी बिरांची त्याच्याकडून करून घेत असलेले परिश्रम यांमुळे बुधियाचे बालपण तर हरवून जात नाही ना हा प्रश्न. या सर्वांची उत्तरे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला मिळतील अशी अपेक्षा आहे. येत्या ५ आॅगस्ट रोजी ‘बुधिया सिंग’ प्रदर्शित होत आहे.


Web Title: TRAILER OUT: 'Budhia Singh'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.