Trailer: Kamal Haasan's 'backing'! Awesome action incarnation seen in 'Vishwaroop2' trailer !! | Trailer : कमल हासन यांची दमदार ‘वापसी’! ‘विश्वरूप2’च्या ट्रेलरमध्ये दिसला जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार!!

यंदाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘विश्वरूप2’ चा ट्रेलर रिलीज झालाय. अभिनेता कमल हासन यांच्या या चित्रपटाची सिनेरसिकांना ब-याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाद्वारे कमल हासन सुमारे दोन वर्षांनंतर वापसी करताहेत. ट्रेलरमध्ये त्यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार चाहत्यांसाठी एक ट्रिट म्हणता येईल. ट्रेलरचा बहुतांश भाग अ‍ॅक्शनने भरलेला आहे. यातला कमल हासन यांचा अंडरवॉटर सीन तर अंगावर रोमांच उभे करणारा आहे. यात त्यांनी रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे रिलीज खोळंबले होते. चित्रपट फार पूर्वीच बनून तयार होता. मात्र पोस्ट प्रॉडक्शन आणि काही व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम खोळंबून होते. येत्या १० आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तामिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आज या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर आमिर खानने रिलीज केला. तेलगू ट्रेलर ज्युनिअर एनटीआर आणि श्रुती हासन यांनी रिलीज केला. 

 

ALSO READ : वादांचे दुसरे नाव म्हणजे कमल हासन; यामुळे सापडलायं वादात!

हा चित्रपट ‘विश्र्वरूपम’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ख़रे तर हा सीक्वल २०१३ मध्येचं रिलीज व्हायला हवा होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे या चित्रपटाची निर्मिती वारंवार पुढे ढकलावी लागली होती. अखेर कमल हासन यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतला आणि चित्रपटाचे काम मार्गी लागले. त्यानंतर आत्ता कुठे पाच वर्षांनी हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. सूत्रांचे मानाल तर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये सेन्सॉर बोर्डाने १७ कट्स सुचवले आहेत. चित्रपटातील काही धार्मिक आणि राजकीय दृश्यांवर कात्री चालल्याची माहिती मिळतेय. चित्रपटात शेखर कपूर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. याशिवाय राहुल बोस, वहिदा रहेमान, जयदीप अहलावत, युसूफ हुसैन हेही खास भूमिकेत आहेत. तेव्हा हा ट्रेलर बघा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

Web Title: Trailer: Kamal Haasan's 'backing'! Awesome action incarnation seen in 'Vishwaroop2' trailer !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.