Topy actress to make Sanyami Kher | ​सैयामी खेरला बनायचेय ‘टॉप’ची अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना प्रत्येक कलाकाराच्या मनात अनेक स्वप्न असतात. मोठ्या पडद्यावर लहानपणापासून पाहिलेल्या स्टार्ससारखे होण्याचे ध्येय घेऊन ते मायानगरीत येत असतात. सैयामीचे हे स्वप्न तिच्या पहिल्या चित्रपटातून पूर्ण जरी होऊ शकले नसले तरी आगामी काळात ती नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळवेल, असा तिला विश्वास आहे.

हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर यांचा डेब्यू चित्रपट ‘मिर्झिया’ बॉक्स आॅफिसवर चांगलाच सपाटून आपटला. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही सिनेमाकडे पाठ फिरवल्यामुळे तिने ज्या अपेक्षा बाळगलेल्या असतील त्या काही अपूर्ण राहिल्याच. पण अपयश मागे टाकून नव्या दमाने ती पुढे जाऊ इच्छिते.

एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, ‘चित्रपट हीट किंवा फ्लॉप होणे सर्वस्वी प्रेक्षकांवर अवलंबून असते. आम्ही मात्र जीव तोडून मेहनत घेतली. या सिनेमातून खूप काही शिकायला मिळाले. ज्याचा उपयोग मला भावी आयुष्यात नक्कीच होईल. येथून पुढे मी आणखी मन लावून काम करणार असून मी आशावादी आहे.’

तिच्या कुटूंबामध्ये दोन लेजेंड - तन्वी आझमी आणि शबाना आझमी - अभिनेत्री आहेत. त्यांची तिला कशी मदत होते यावर ती म्हणाली की, त्या दोघी खूप उच्च दर्जाच्या अभिनेत्री असून त्या नेहमीच मला मार्गदर्शन करीत असतात. मात्र माझा स्वभाव आणि अभिनय पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे आणि मी स्वत:चा मार्ग स्वत: तयार करण्यात विश्वास ठेवते. आगामी काळात तुम्हाला ते दिसेलच. मला टॉपची अभिनेत्री व्हायचे आहे.

अभिनेत्री म्हणून कोणती गोष्ट अवघड वाटते या प्रश्नावर ती म्हणते की, ‘लडाखसारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडी, वारा, पावसामध्ये शूटींग करणे खूपच कठिण होते. परंतु चित्रपटासाठी तेवढे कष्ट घेणे गरजेचेसुद्धा आहे ना.’
Web Title: Topy actress to make Sanyami Kher
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.