Tollywood superstar Pawan Kalyan's third wife gave birth to his fourth child! | टॉलिवूड सुपरस्टार पवन कल्याणच्या तिसºया पत्नीने दिला त्याच्या चौथ्या मुलाला जन्म !

टॉलिवूड सुपरस्टार पवन कल्याण चौथ्यांदा बाप बनला आहे. होय, त्याची पत्नी एना हिने मंगळवारी हैदराबादमधील एक खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. पवन कल्याणचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तो आपल्या मुलाला उचलून घेताना दिसत आहे. पवनला पोलेना नावाची एक मुलगी असून, ती एना नावाच्या पत्नीपासून झाली आहे. एना मूळची रशियाची आहे. त्यामुळेच या दोघांनी मुलीचे नाव असे ठेवले जेणेकरून दोघांना उच्चारताना फारशी अडचण येऊ नये. 

एना पवनची तिसरी पत्नी आहे. पवनचे पहिले लग्न नंदिनीबरोबर १९९७ मध्ये झाले होते. या दोघांचा संसार २००७ पर्यंत चालला. त्यानंतर त्याने २००९ मध्ये ‘जॉनी’मधील त्याची को-स्टार रेणू देसाई हिच्याशी लग्न केले. पुढे २०१२ मध्ये त्याचा रेणूबरोबर घटस्फोट झाला. मात्र तिने पवनपासून दूर होताना अकिरा नावाचा मुलगा आणि आध्या नावाच्या मुलीची जबाबदारी त्याच्यावर सोपविली. वृत्तानुसार पवनची त्याच्या तिसºया पत्नीबरोबर २०११ मध्ये ‘तीन मार’ या चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. चित्रपटात एनाची छोटीशी भूमिका होती. मात्र तेथूनच दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली. पुढे हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. त्याचदरम्यान एनाने त्याच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तोपर्यंत तो कायदेशीररीत्या रेणूपासून विभक्त झाला होता. 

पवनचे एनासोबतचे नाते २०१३ मध्ये उघड झाले. वास्तविक पवन आणि एना सार्वजनिक कार्यक्रमात खूपच कमी वेळा एकत्र बघवयास मिळत असत. नुकतेच हे दोघे बोस्टन विमानतळावर एकत्र बघावयास मिळाले होते. असो, पवनच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अद्यापपर्यंत समोर आले नाही. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाला ‘पीएसपीके२५’ असे नाव दिले जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनिवास संभाल करीत आहेत. हा एक रोमॅण्टिक चित्रपट आहे. 
Web Title: Tollywood superstar Pawan Kalyan's third wife gave birth to his fourth child!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.