title controversy on anurag kashyap film womaniya changed saand ki aankh |  टायटलसाठी मागितले १ कोटी! अनुराग कश्यप बदलले ‘वुमनिया’चे नाव!!
 टायटलसाठी मागितले १ कोटी! अनुराग कश्यप बदलले ‘वुमनिया’चे नाव!!

ठळक मुद्देतापसी पन्नू व भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या ‘सांड की आंख’ या चित्रपटाची माहिती दिली होती. जगातील सर्वांत वयस्कर शार्पशूटर महिलांच्या आयुष्यावर हा चित्रपटाची कथा बेतलेली आहे.

अनुराग कश्यप आणि वाद यांचे जुने नाते आहे. तूर्तास अनुरागचा ‘वुमनिया’ हा आगामी चित्रपट चर्चेत आहे. काल-परवा या चित्रपटाची घोषणा झाली आणि यानंतर लगेच या चित्रपटाचा ‘वुमनिया’ या शीर्षकावरून वाद सुरु झाला. दिग्दर्शक व निर्माता प्रीतिश नंदी यांनी ‘वुमनिया’ हे टायटल त्याच्याकडे असल्याचा दावा केला. अनुरागला हे टायटल हवे असेल तर त्याने १ कोटी रूपये द्यावेत, असेही नंदीने जाहीर केले. मग काय, १ कोटी चुकवून ‘वुमनिया’ हे टायटल खरेदी करण्यापेक्षा अनुरागने आपल्या चित्रपटाचे नाव बदलणेच योग्य समजले आणि ‘वुमनिया’चे ‘सांड की आंख’ असे नवे नामकरण केले.
यानंतर प्रीतिश नंदी आणि अनुराग कश्यप यांच्या ट्वीटरवर चांगलेच वाक्युद्ध रंगले. अनुरागने प्रीतिशवर हल्ला चढवत, १ कोटी रूपये मागणे म्हणजे खंडणी मागण्यासारखे असल्याचे म्हटले. आम्ही प्रीतिश नंदीला १ कोटी देणार नाहीच. त्यामुळे त्याने ‘वुमनिया’ हे टायटल स्वत:कडेच सांभाळून ठेवावे. कदाचित पुढे त्याच्या कंपनीला याचा फायदा होईल, असे ट्वीट अनुरागने केले. मी प्रीतिश नंदीवर विश्वास ठेवला हे चुकलेचं, असेही एका ट्वीटमध्ये त्याने म्हटले.
तापसी पन्नू व भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या ‘सांड की आंख’ या चित्रपटाची माहिती दिली होती. जगातील सर्वांत वयस्कर शार्पशूटर महिलांच्या आयुष्यावर हा चित्रपटाची कथा बेतलेली आहे. ८७ वर्षांच्या चंद्रो आणि ८२ वर्षांच्या प्राक्षी या दोन आजी उत्तर प्रदेशातील जोहरी गावाच्या रहिवासी आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी शॉर्पशूटींग सुरु केली होती. तापसी व भूमी या दोघींच्या भूमिकेत दिसणार आहेत.  
‘सांड की आंख’या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत.  


Web Title: title controversy on anurag kashyap film womaniya changed saand ki aankh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.