बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड तैमूरचा लूक बदलला आहे. सैफ अली खान व करीना कपूरचा लाडका नवाबने नवीन हेअर कट केला आहे. तैमूर स्पाइक कटमध्ये खूपच क्यूट दिसतो आहे. 

तैमूरचा नवा हेअरकटमधील फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो सैफ अली खानच्या कडेवर बसलेला दिसतो आहे. 

तैमूर जिथे कुठे जाईल तिथले त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तो पॅपाराझीचा आवडता स्टार किड आहे. त्यामुळे तैमूरला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते.

जेवढी चर्चा तैमूरच्या क्युटनेसची होते तेवढेच ट्रेंडमध्ये त्याची स्टाईल असते. तैमूरचा हेअरस्टाईल असेल किंवा आऊटफिट... लहान मुलांसाठी तो फॅशन आयकॉन बनला आहे. तैमूरची लोकप्रियता पाहता त्याच्यासारखा दिसणारा बाहुलादेखील मार्केटमध्ये आला होता.


तैमूर नेहमीच नॅनी, करीना कपूर व सैफसोबत दिसतो. 


Web Title: Timur's new look, super cute, new look in new haircut, SEE PHOTOS
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.