This time Nawazuddin Siddiqui will stay away from Ramlila; Being a Muslim was opposed! | यंदाही नवाजुद्दीन सिद्दिकी ‘रामलीला’पासून राहणार दूर; मुस्लीम असल्याने झाला होता विरोध!

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणाºया नवाजुद्दीन सिद्दिकीला आॅल राउंडर अभिनेता म्हणून ओळखले जाते. कुठलीही भूमिका असो, त्याला नवाज न्याय देणार हे ठरलेलं सूत्र आहे. गंभीर भूमिकांपासून ते रोमान्सपर्यंतच्या भूमिका साकारण्यास नवाजचा हातखंडा आहे. मुजफ्फरनगर येथील राहणारा नवाज पुन्हा एकदा वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. होय, गेल्यावर्षी शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘रामलीला’मध्ये मारीचची भूमिका साकारण्यास नवाजला केलेला विरोध याहीवर्षी कायम आहे. त्यामुळे यंदादेखील नवाजुद्दीन ‘रामलीला’पासून दूर राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. 

गेल्यावर्षी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘रामलीला’ नाटकात मारीचची भूमिका साकारणाºया नवाजला विरोध केला होता. नवाज मुस्लीम असल्याचे कारण देऊन सेना कार्यकर्त्यांनी त्याला नाटकापासून दूर ठेवले होते. त्यावेळी नवाजने ट्विट करून म्हटले होते की, ‘मला माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. परंतु मी पुढच्या वर्षी नक्कीच ‘रामलीला’चा भाग बनणार. सध्या ‘रामलीला’चे आयोजक नवाजच्या वापसीची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र त्यांनी अद्यापपर्यंत नवाजशी याविषयी कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. नवाज ‘रामलीला’मध्ये मारीचची भूमिका साकारणार होता. परंतु राइट विंगच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रखर विरोध केला होता. तसेच त्यांनी असा दावा केला होता की, गेल्या ५० वर्षांपासून ‘रामलीला’च्या स्टेजवर एकाही मुस्लीम कलाकाराने पाऊल ठेवले नाही. 


 
‘रामलीला’चे आयोजक विनीत कल्याणने टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना म्हटले की, ‘मला नाही वाटत की, यावर्षी नवाज ‘रामलीला’मध्ये काम करू शकणार. मात्र, आम्ही अजूनही त्याच्या परतण्याची प्रतीक्षा करीत आहोत. नवाजचे चाहते त्याला स्टेजवर बघण्यास उत्सुक आहेत. स्वत:ला नवाजचे चाहते सांगणारे स्थानिक नागरिक नवाब कुरेशीने टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ‘मी नक्कीच त्यांना जाऊन भेटणार आहे. मला अपेक्षा होती की, जर राजकारण आणि कला यांचा संबंध जोडला गेला नसता तर त्यांनी नक्कीच गेल्यावर्षी ‘रामलीला’मध्ये अभिनय केला असता. 
 

My childhood dream could not come true, but will definitely be a part of Ramleela next year.
Check the rehearsals.
pic.twitter.com/euOYSgsm3F

— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) October 6, 2016}}}} ">My childhood dream could not come true, but will definitely be a part of Ramleela next year.
Check the rehearsals. pic.twitter.com/euOYSgsm3F

— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) October 6, 2016
 

तर ‘रामलीला’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे रुचित शर्मा यांनी सांगितले की, ‘गेल्यावेळेस मला एवढ्या मोठ्या महान कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, मला अपेक्षा आहे की, यावेळेस त्यांच्यासोबत काम करायला मिळेल. गेल्यावर्षी जेव्हा नवाजला हिंदू कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला होता, तेव्हा ‘रामलीला’चे शो रद्द करण्यात आले होते. यावेळेसही नवाजला विरोध होण्याची शक्यता असल्याने त्याने ‘रामलीला’पासून दूर राहण्याचे ठरविले आहे, असे समजते. 

Web Title: This time Nawazuddin Siddiqui will stay away from Ramlila; Being a Muslim was opposed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.