‘दिलबर’वर असा बेधूंद नाचला टायगर श्रॉफ! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 02:22 PM2018-12-21T14:22:05+5:302018-12-21T14:22:12+5:30

होय,‘दिलबर’वर डान्स करण्याचा मोह टायगरलाही आवरता आला नाही. मग काय तो असा काही बेधूंद नाचला की, त्याचा हा डान्स व्हिडिओही क्षणात व्हायरल झाला.

Tiger Shroff's Sexy Dance Moves on Dilbar Song | ‘दिलबर’वर असा बेधूंद नाचला टायगर श्रॉफ! पाहा, व्हिडिओ!!

‘दिलबर’वर असा बेधूंद नाचला टायगर श्रॉफ! पाहा, व्हिडिओ!!

googlenewsNext
ठळक मुद्देटायगरने आपल्या सोशल अकाऊंटवर हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यातील टायगरच्या डान्स मुव्ह सुश्मिता सेन आणि नोरा फतेही दोघींनाही लाजवणा-या आहेत.

नोरा फतेहीच्या ‘दिलबर’ गाण्याने यावर्षी धूम केली. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या अलीकडे रिलीज झालेल्या चित्रपटात सुश्मिता सेनच्या गाजलेल्या ‘दिलबर’ गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन तयार करण्यात आले होते. या रिक्रिऐटेड व्हर्जनवर नोराने धम्माल डान्स केला होता. तिच्या अदांनी अक्षरश: आग लावली होती. सोशल मीडियावर तुफान हिट झालेल्या या गाण्यावर पुढे अनेक जण डान्स करताना दिसले. आता या यादीत टायगर श्रॉफ याचे नावही सामील झाले आहे. होय,‘दिलबर’वर डान्स करण्याचा मोह टायगरलाही आवरता आला नाही. मग काय तो असा काही बेधूंद नाचला की, त्याचा हा डान्स व्हिडिओही क्षणात व्हायरल झाला.


 टायगरने आपल्या सोशल अकाऊंटवर हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यातील टायगरच्या डान्स मुव्ह सुश्मिता सेन आणि नोरा फतेही दोघींनाही लाजवणा-या आहेत. ‘दिलबर’वर टायगरने असा काही ताल धरलाय की, त्याचा डान्स पाहून सुश्मिता व नोरा टायगरच्या प्रेमात पडल्या. तुम्हीही टायगरचा हा डान्स पाहिल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.


टायगर श्रॉफबद्दल सांगायचे तर सध्या तो  ‘स्टुडंट आॅफ द ईअर 3’मध्ये बिझी आहे. याशिवाय त्याने ‘बागी 3’चीही घोषणा केलीय. मार्च २०२० मध्ये ‘बागी 3’ प्रदर्शित होतोय. ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये होती. ‘बागी 2’मध्ये दिशा पटनी टायगरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली होती. ‘बागी 3’मध्ये टायगरसोबत कोण स्क्रिन शेअर करणार, हे अद्याप ठरलेले नाही.
‘बागी’साठी टायगर वेगवेगळे स्टंट शिकतो आहे. आधीच्या दोन भागांपेक्षाही थरारक असे अ‍ॅक्शन स्टंट यात दिसणार आहे. हे स्टंट डिझाईन करण्यासाठी भारत आणि विदेशातील स्टंट डायरेक्टर्सची मदत घेतली जात आहे. ‘बागी2’ने यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत स्थान कमावले होते. त्यामुळे ‘बागी3’कडून चाहत्यांना विशेष अपेक्षा आहेत.  


 

Web Title: Tiger Shroff's Sexy Dance Moves on Dilbar Song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.