टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 04:20 PM2018-08-22T16:20:56+5:302018-08-22T16:21:28+5:30

टायगरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हवेत संपूर्ण ३६० डिग्री अंशामध्ये टायगर रोल जंप करताना दिसतो आहे.

Tiger Shroff unbelievable mid air stunt video viral on social media | टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

googlenewsNext
ठळक मुद्देटायगर श्रॉफ ‘स्टुंडट ऑफ द इयर २’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र

बॉलिवूडचा बागी म्हणजेच अभिनेता टायगर श्रॉफने हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अल्पावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त टायगर डान्स व अॅक्शनसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळेच तो त्याच्या प्रत्येक चित्रपटात अॅक्शन करताना दिसला आहे. तसेच टायगर नेहमी सोशल मीडियावर स्टंटचे व्हिडिओ शेअर करीत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडिओत टायगर हवेत रोल जंप घेताना दिसतो आहे. 

टायगरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हवेत संपूर्ण ३६० डिग्री अंशामध्ये टायगर रोल जंप करताना दिसतो आहे. ही उडी अतिशय कठीण असूनही टायगरने सर्कल पूर्ण केल्याचे दिसत आहे आणि ही उडी पूर्ण करूनही अतिशय आरामात तो पुन्हा आपल्या पायावर उभा राहताना दिसत आहे. याची खास गोष्ट अशी की, टायगरने स्वतः हा व्हिडिओ पोस्ट करून लिहिले की, ‘हवेतल्या हवेत स्वतःला मिठी मारण्याचा एक प्रयत्न’. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टायगरने पोस्ट केलेला हा व्हिडिओ नेटिझन्सना प्रचंड प्रमाणात आवडत असल्याचे दिसत आहे. 


सध्या टायगर श्रॉफ आगामी ‘स्टुंडट ऑफ द इयर २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि अभिनेत्री तारा सुतरिया या दोघी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा चित्रपट पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करत असून पुढील वर्षी १० मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘बागी ३’ मध्येही टायगरच दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे.

Web Title: Tiger Shroff unbelievable mid air stunt video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.