SOTY 2 Trailer: आलेत करण जोहरचे नवे स्टुडंट! पाहा, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 01:01 PM2019-04-12T13:01:19+5:302019-04-12T13:01:32+5:30

रणच्या दुस-या क्लासचे आणखी तीन स्टुडंट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचे तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.

Tiger Shroff, Ananya Panday and Tara Sutaria starrer Student of the Year 2 trailer out | SOTY 2 Trailer: आलेत करण जोहरचे नवे स्टुडंट! पाहा, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर!!

SOTY 2 Trailer: आलेत करण जोहरचे नवे स्टुडंट! पाहा, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट आधी २३ नोव्हेंबर २०१८ मध्ये रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे.

सात वर्षांपूर्वी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफद ईअर’मधून तीन स्टुडंट बाहेर पडले होते. हे स्टुडंट होते, आलिया भट, वरूण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा. हे तिन्ही स्टुडंट प्रेक्षकांना असे काही भावले की, आज तिघेही सुपरस्टार्स आहेत. आता करणच्या दुस-या क्लासचे आणखी तीन स्टुडंट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचे तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.
पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफसोबतअनन्या पांडे आणि तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. अनन्या आणि तारा या दोघींचाही हा डेब्यू सिनेमा आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे झाल्यास, धर्मा प्रॉडक्शनच्या प्रत्येक चित्रपटात दिसणारा सर्व मसाला यात आहे. मोठ-मोठे सेट, स्टाईलिश कपडे, प्रेमात गोंधळलेले तरूण...असे सगळे आहे. शिवाय टायगरची अ‍ॅक्शन आणि बेधडक डान्सही सोबतीला आहे. कॉलेजच्या कॅम्पसपासून ट्रेलरची सुरुवात होते. या ट्रेलरमध्ये  मस्ती आहे, प्रेम आहे आणि वैर असे सगळे पाहायला मिळतेय.




स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट आधी २३ नोव्हेंबर २०१८ मध्ये रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे.
२०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईअर ’ हा चित्रपट रिलीज झाला होता. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून आलिया, वरूण आणि सिद्धार्थ यांनी डेब्यू केला होता. हा चित्रपट तरूणाईने प्रचंड डोक्यावर घेतला होता. आता इतक्या वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: Tiger Shroff, Ananya Panday and Tara Sutaria starrer Student of the Year 2 trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.