Tiger Ali Khan returns with his first foreign trip with Mom-Dad | ​मॉम-डॅडसोबत पहिल्या फॉरेन ट्रीपवरून परतला तैमूर अली खान!

तान्हुला तैमूर अली खान आपल्या मॉम-डॅडसोबत पहिल्या-वहिल्या फॉरेन ट्रीपवरून परतला आहे. शनिवारी रात्री उशीरा सैफ अली खान, करिना कपूर आणि सोबत त्यांचा लाडका तैमूर असे तिघेही मुंबई विमानतळावर उतरले. यावेळी करिना सैफच्या हातात हात घालून दिसली तर छोटा नवाब आपल्या डॅडच्या कडेवर दिसला. विमानतळावर मीडियाचे कॅमेरे या तिघांकडे वळले. पण डॅडच्या कडेवर असलेला तैमूर कॅमेºयाला अगदी सहजपणे सामोरा गेला. 

मुंबई विमानतळावरचे करिना, सैफ व तैमूरचे काही फोटो आमच्या हाती लागले आहेत. यात तैमूर पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये नेहमीप्रमाणे क्यूट दिसतोय. मॉम करिनाने ब्लॅक टाऊजरसोबत ब्लॅक टी-शर्ट तर सैफने व्हाईट अ‍ॅण्ड पर्पल चेक शर्ट घातलेला दिसतोय.
गत २५ जुलैला सैफ व करिना स्वित्झर्लंडसाठी रवाना झाले होते. तैमूरच्या जन्मानंतरच्या ७ महिन्यांतील ही त्यांची पहिली विदेशवारी होती. खरे तर सैफ आणि करिना हे दोघेही सोशल मीडियावर नाहीत. पण या व्हॅकेशनवरचे त्यांचे फोटो वेगाने व्हायरल झाले होते. फॅमिली फोटोसोबत सैफ व करिना दोघेही चाहत्यांसोबतही फोटो काढताना यावेळी दिसले होते. एका फोटोत सैफ तैमूरच्या माथ्याचे चुंबन घेताना दिसला होता. स्वित्झर्लंडच्या रॉयल जीस्टँड पॅलेसमध्ये करिना व सैफ थांबले होते. येथे दोन आठवडे सुट्टी एन्जॉय केल्यानंतर सैफ व करिना  मुंबईत परतले. सैफिनाचा हा आवडता व्हॅकेशन स्पॉट आहे. लग्नापासून अनेकदा सैफिना याठिकाणी सुट्टी घालवताना दिसलेत. स्वित्झर्लंडवरून सुट्टी एन्जॉय केल्यानंतर सैफ व करिना दोघेही आपआपल्या कामात बिझी होणार आहेत.  
Web Title: Tiger Ali Khan returns with his first foreign trip with Mom-Dad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.