Thus Harshavardhana celebrates Birthday | ​अशा प्रकारे करणार हर्षवर्धन BIRTHDAY साजरा

अनिल कपूर यांचा मुलगा आणि यंदा ‘मिर्झिया’ चित्रपटातून चंदेरी दुनियेत पदार्पण केलेल्या हर्षवर्धनचा आज (दि. ९) वाढदिवस. आता स्टारचा बर्थडे म्हणजे बिग बॅश, लक्झरी पार्टी असा काहीसा बडेजाव असतो. मात्र हर्षवर्धन याला अपवाद आहे. पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपाटून आपटल्यावर तो सध्या ‘भावेश जोशी’ सिनेमावर प्रचंड मेहनत घेतोय. डेडीकेशन एवढे की, त्याने वाढदिवसाची सुटी पण नाही घेतली.

सुत्रांनुसार, हर्षवर्धन ‘भावेश जोशी’च्या सेटवरच बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने आणि सर्व क्रु मेंबर्स मिळून त्याला धमाकेदार पार्टी देणार आहेत. तसेच पॅक -अपनंतर तो कुटुंबासोबत राहणार आहे. सो नो तामझाम!

तो सांगतो, ‘बर्थ डे साजरा करण्याचे मला जास्त वेड नाही. मी नेहमीच साधेपणाने हा दिवस सेलिब्रेट करतो यावेळी शूटींगमध्ये व्यस्त असल्याने सेटवरच सेलिब्रेशन होईल. सहकाऱ्यांबरोबर हा माझा पहिलाच वाढदिवस असेल. या स्पेशल दिवशी मी मला जे मनापासून आवडते ते करण्याचा प्रयत्न करतो, आणि आज मला या चित्रपटावर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यानंतर सर्व फॅमिलीबरोबर जेवण असा बेत आहे.’

नेक्स्ट जनरेशन स्टार : हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर

राकेश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झिया’कडून त्याला खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रेक्षकांनी नाकारल्यावर तो म्हणतो, अधिक मेहनत घेण्याची मला प्रेरणा मिळाली आहे. मी निराश झालो पण हताश नाही. आपण मेहनत घेत राहायची, पुढचे सगळे प्रेक्षकांवर सोडून द्यायचे.’

या सिनेमात त्याच्याबरोबर सैयामी खेरनेसुद्धा डेब्यू केला होता. आपल्या भावासाठी फॅशनिस्टा सोनम कपूर काय सरप्राईज देणार हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल.

अशा या बॉलीवूडच्या नेक्स्ट जनरेशन हीरोला ‘सीएनएक्स मस्ती’कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
Web Title: Thus Harshavardhana celebrates Birthday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.