Thugs Of Hindostan Movie Trailer : पाहा, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दमदार ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:07 PM2018-09-27T12:07:40+5:302018-09-27T12:08:19+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, महानायक अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

 Thugs Of Hindostan Movie Trailer | Thugs Of Hindostan Movie Trailer : पाहा, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दमदार ट्रेलर!

Thugs Of Hindostan Movie Trailer : पाहा, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दमदार ट्रेलर!

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, महानायक अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. आज यश चोप्रा यांच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा ट्रेलर रिलीज केला गेला. अलीकडे या चित्रपटातील अनेक पात्रांचा फर्स्ट लूक रिलीज झाला. सर्वात शेवटी चित्रपटातील लीड हिरो अर्थात आमिर खानचा लूक रिलीज केला गेला. तेव्हापासून ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या ट्रेलरची आतूरतेने प्रतीक्षा केली जात होती. आज ही प्रतीक्षा संपली.

चित्रपटाचा ट्रेलर आपल्याला थेट १७९५ सालात घेऊन जातो. ईस्ट इंडिया कंपनी आली होती व्यापार करायला पण आता भारतावर राज करू लागली आहे. मात्र काही लोकांना गुलामी मान्य नव्हती, इथून ट्रेलरला सुरुवात होते. ट्रेलरच्या सुरूवातीलाच ‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दिसतो. तो पाहून अंगावर शहारे येतात. या आझादला पकडणार इंग्रजांना आझादसारखाचं बहादूर ठग हवा असतो. हा ठग म्हणजे आमिर खान. आमिर खानची एन्ट्री जबरदस्त आहे. त्याचा विनोदी अंदाज मनाला भावतो. पुढे आमिर आणि अमिताभची जुगलबंदीही ट्रेलरमध्ये दिसते. कॅटरिनाचा ग्लॅमरस अंदाज, फातिमाचा अ‍ॅक्शन अंदाज सगळेच काही नजर खिळवून ठेवतो. एकंदर काय तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा ट्रेलर पाहताना ‘मजा’ येते. आता ट्रेलर पाहतांनाच इतकी मजा येत असेल तर चित्रपट पाहतांना किती येईल, याचा अंदाज तुम्हीच घेतलेला बरा...

Web Title:  Thugs Of Hindostan Movie Trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.