'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पहिल्याच दिवशी करणार एवढी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:53 PM2018-11-07T18:53:34+5:302018-11-07T18:54:16+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.

'Thugs of Hindostan' earns so much on the first day | 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पहिल्याच दिवशी करणार एवढी कमाई

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पहिल्याच दिवशी करणार एवढी कमाई

ठळक मुद्देठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपट ८ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित


बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला असून अॅडव्हान्स बुकिंगदेखील बंद झाली आहे. व्यापार विश्लेषकाच्या मते हा सिनेमा पहिल्याच दिवशी पन्नास कोटींचा बिझनेस करू शकतो. 

ओपनिंग डेला चांगली कमाऊ करणाऱ्या चित्रपटाच्या रेकॉर्डमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा 'हॅप्पी न्यू ईयर'चा समावेश आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ४४.९७ कोटींची कमाई करीत बॉक्सऑफिसचा रेकॉर्ड मोडला होता. तर दुसरा चित्रपट बाहुबली होता. ज्याने पहिल्याच दिवशी ४१ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आता हा विक्रम ठग्स ऑफ हिंदोस्तान मोडू शकतो. कारण या चित्रपटात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आहेत. आमीर खान, अमिताभ बच्चन व कतरिना कैफ यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षक पहिल्यांदाच अमिताभ बच्चन व आमीर खान यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणार आहेत. 
कोमल नाहटा यांच्या मते 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' २०१८मधील सर्वात हिट चित्रपट ठरू शकतो. कारण यात दोन मोठे स्टार आहेत. तर आमोद मेहरा यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी चांगली कमाई करेल या चित्रपटाच्या विषयामुळे. हा चित्रपट चार दिवसात २०० कोटींचा पल्ला पार करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपट ८ नोव्हेंबरला देशभरात ४००० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: 'Thugs of Hindostan' earns so much on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.