Thousands of students, Ayyarie's actress, Ups Moment's victim, see video! | हजारो विद्यार्थ्यांसमोर ‘अय्यारी’ची ही अभिनेत्री उप्स मोमेंटला पडली बळी, पाहा व्हिडीओ!

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी यांचा ‘अय्यारी’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असला तरी, चित्रपटाची संपूर्ण कास्ट अजूनही प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच सिद्धार्थ आणि अभिनेत्री रकुल प्रीत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीतील एका कॉलेजमध्ये गेले होते. याठिकाणी त्यांनी हजारो विद्यार्थ्यांसमोर ‘ले डूबा’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला. मात्र याचदरम्यान असे काही घडले ज्यामुळे रकुल प्रीतला वार्डरोब मालफंक्शनला बळी पडावे लागले. सध्या रकुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

त्याचे झाले असे की, सिद्धार्थ आणि रकुल दिल्लीतील एसआरसीसी कॉलेजमध्ये ‘अय्यारी’च्या प्रमोशनसाठी गेले होते. याठिकाणी या दोघांनीही हजारो विद्यार्थ्यांसमोर परफॉर्मन्स केला. मात्र परफॉर्मन्स दरम्यान सिद्धार्थने रकुलला उचलल्यामुळे तिचा ड्रेस काहीसा वरच्या बाजूने गेला. अगोदरच शॉर्ट ड्रेसमध्ये असलेल्या रकुलला जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तिने लगेचच सिद्धार्थला खाली उतरविण्यास सांगितले. तसेच ड्रेस सावरत पुन्हा विद्यार्थ्यांसमोर परफॉर्मन्स केला. मात्र यादरम्यान अनेकांनी रकुल आणि सिद्धार्थमधील हा सीन मोबाइलच्या कॅमेºयात कैद केला. 
 
यावेळी सिद्धार्थ आणि रकुलमधील केमिस्ट्री कमालीची होती. दोघेही अप्रतिम दिसत होते. त्यांची एक झलक टीपण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, यांचा ‘अय्यारी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्यास समीक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर पहिल्याच दिवशी चित्रपटाला संथ प्रतिसाद मिळाल्यामुळे वीकेण्डमध्ये कमाईचा आकडा कितपत गाठू शकेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

दरम्यान, बॉक्स आॅफिसवर सध्या अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ने काहीशी समाधानकारक कमाई केली आहे. त्यामुळे या आठवड्यातही ‘पॅडमॅन’चाच बोलबाला राहण्याची शक्यता आहे. ‘अय्यारी’ प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरताना दिसत असल्याने ‘पॅडमॅन’ला ‘ब्लॅक पॅँथर’ या हॉलिवूडपटाशी दोन हात करावे लागणार आहेत. 
Web Title: Thousands of students, Ayyarie's actress, Ups Moment's victim, see video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.