'Those' four women did not sleep overnight, Bobby Deol, what is the episode? | ‘त्या’ चार महिलांमुळे रात्रभर झोपला नाही बॉबी देओल, वाचा काय आहे प्रकरण!

तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतलेला अभिनेता बॉबी देओल सध्या पुन्हा एकदा आपल्या करिअरला पटरीवर आणण्यासाठी धडपड करीत आहे. त्यासाठी त्याने ‘पोस्टर बॉइज’ रिलीज झाल्यानंतर लाइमलाइटपासून दूर जायचे नाही हेदेखील ठरविले आहे. सलमान खानच्या आगामी ‘रेस-३’शी संबंधित एखादा इव्हेंट असो वा ‘यमला पगला दिवाना’शी संबंधित मिटिंग असो बॉबी त्याठिकाणी आवर्जून उपस्थित राहतो. आता त्याचा एक फोटो समोर आला असून, त्यामुळे बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोरिओग्राफर तथा दिग्दर्शक फराह खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये बॉबीचा चेहरा चांगलाच हिंरमुसलेला दिसत आहे. मात्र त्याची अवस्था कशामुळे झाली हे तुम्हाला माहिती आहे काय? त्याचाच आम्ही उलगडा करणार आहोत. 

त्याचे झाले असे की, बॉबी देओलला चार महिलांनी रात्रभर झोपू न दिल्याने त्याची अशी अवस्था झाली. फ्लाइटमध्ये काढलेल्या या फोटोमध्ये हुमा कुरेशी, अथिया शेट्टी, सानिया मिर्झा आणि फराह खान दिसत आहेत. याच त्या चार महिला आहेत, ज्यांनी बॉबीला रात्रभर झोपू दिले नाही. दिल्लीत एका इव्हेंटसाठी पोहोचलेल्या या चारही सेलेब्सने खूप मस्ती केली. मात्र याचा त्रास बॉबी देओलला सहन करावा लागला. फराहने हा फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘आम्ही दिल्ली पोहोचलो. बिचाºया बॉबी देओलला रात्रभर झोप आली नाही. त्याचे कारण या चार महिला आहेत.’
 

बॉबीविषयी सांगायचे झाल्यास नुकताच रिलीज झालेल्या ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटात तो अतिशय फनी अंदाजात बघावयास मिळाला. चित्रपटाची कथा अशा तीन लोकांची होती, ज्यांच्या अपरोक्ष त्यांचे फोटो नसबंदीच्या पोस्टर्सवर झळकविले जातात. बॉबी बराच काळ पडद्यावरून दूर होता. त्याचे कारण सांगताना बॉबीने म्हटले होते की, ‘मी कधीच अशा कारणामुळे त्रस्त झालो नाही. कारण मी माझ्या वडिलांच्या करिअरमध्ये असे चढउतार जवळून बघितले आहेत. 
Web Title: 'Those' four women did not sleep overnight, Bobby Deol, what is the episode?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.