These five films of Sridevi are South! | हिंदी इतकेचं यादगार ठरलेत श्रीदेवीचे साऊथचे हे पाच चित्रपट !

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला आपलेसे केले. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयास सुरूवात केली. हिंदी चित्रपटांनी श्रीदेवींना ओळख दिली. पण त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला तो साऊथच्या चित्रपटापासून. साऊथमध्ये श्रीदेवींनी अनेक शानदार चित्रपट दिलेत. फार कमी लोकांना हे ठाऊक असावे की, श्रीदेवींनी एका चित्रपटात दिवंगत जयललिता यांच्यासोबतही बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटात जयललिता देवी पार्वतीच्या भूमिकेत होत्या तर श्रीदेवी यांनी भगवान मुरूगनची भूमिका साकारली होती. 
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काही यादगार चित्रपटांसाठी श्रीदेवींना ओळखले जाते.

Sigappu Rojakkal:- सन १९७८ साली आलेला हा चित्रपट एक थ्रीलर चित्रपट होता. यात श्रीदेवींनी एका सीरियल किलरच्या प्रेमात पडलेल्या तरूणीची भूमिका साकारली होती. यात श्रीदेवीच्या अपोझिट होता कमल हासन. हा सुपरहिट चित्रपट आजही दाक्षिणात्य चित्रपटप्रेमींच्या मनात जिवंत आहे.

Moondram Pirai: बालू महेन्द्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात श्रीदेवींनी मानसिक धक्का बसलेल्या मुलीची भूमिका साकारली होती.  याही चित्रपटात कमल हासन हाच श्रीदेवीच्या अपोझिट होता. या चित्रपटातील दोघांच्याही भूमिका लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या होत्या. हिंदीत हाच चित्रपट ‘सदमा’ नावाने आला. ‘सदमा’ तील ‘ऐ जिंदगी’, ‘सुरमइ अखियों में’ ही अजरामर गाणी अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

Meendum Kokila: हा साऊथचा कॉमेडी चित्रपट प्रचंड लोकप्रीय झाला होता. जी एन रंगाराजन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातही श्रीदेवी आणि कमल हासन ही लोकप्रीय जोडी होती. या चित्रपटात कमल हासन यांचे श्रीदेवीशी लग्न होते. पण त्यानंतर तो दुस-याच महिलेच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात श्रीदेवी अतिशय रोचक भूमिकेत दिसल्या होत्या. साऊथच्या चित्रपटात सर्वाधिक यादगार कॉमेडी चित्रपट म्हणून तो ओळखला जातो.

Vayathinile: या चित्रपटात श्रीदेवी यांनी १६ वर्षांच्या मुलीची भूमिका साकारली होती. साऊथचे दोन बडे स्टार रजनीकांत आणि कमल हासन यात लीड भूमिकेत होते. या दोन बड्या स्टार्सपेक्षा श्रीदेवींचा अभिनय  कमी नव्हता.

ALSO READ : एक दुर्दैवी योगायोग! अर्जुनप्रमाणेच जान्हवीचा ‘डेब्यू’ पाहण्यासाठीही आई नाही!

cnxoldfiles/span> हा श्रीदेवींच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणता येईल. याच चित्रपटाद्वारे तिने लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.  आपल्या पहिल्याच चित्रपटात श्रीदेवींना कमल हासन व रजनीकांत या दोन सुपरस्टार्सशी कामकरण्याची संधी मिळाली होती.
Web Title: These five films of Sridevi are South!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.