अबोली कुलकर्णी
डोळयात क्रूर भाव, लांब लांब मिशा, कपाळावर लाल टिळा, हातात हत्यार हे सर्व वर्णन वाचून तुमच्या समोर ज्या व्यक्तीचे चित्र उभे राहते ते म्हणजे दरोडेखोराचे. ७०च्या दशकापासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेकदा आपण अशा वर्णनाचा दरोडेखोर पाहिला. त्याला पाहिल्यावर आपला थरकाप उडावा असा त्यांचा अभिनय. पडद्यावर अनेक कलाकारांनी दरोडेखोरांच्या भूमिका रंगवल्या. चला तर मग आज मोठ्या पडद्यावर दरोडेखोरांच्या भूमिका साकारलेल्या कलाकारांचा आढावा घेऊया...वीरप्पन - संदीप भारद्वाज
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘वीरप्पन’ या चित्रपटात भारतीय दरोडेखोराची भूमिका संदीप भारद्वाज याने केली आहे. दरोडेखोराचा मेकअप, त्याचे राहणीमान, लाइफस्टाइल यांचा अवलंब करण्यासाठी संदीप भारद्वाजने बरीच मेहनत घेतली होती. पान सिंग तोमर - इरफान खान
बॉलिवूडचा नव्या दमाचा अभिनेता म्हणून आपण इरफान खानकडे पाहतो. अभिनयाची उत्तम जाण, उत्कृष्ट देहबोली यांच्यामुळे इरफानकडे दिग्दर्शक मोठ्या आशेने पाहतात. तिग्मांशू धूलिया दिग्दर्शित ‘पान सिंग तोमर’ या चित्रपटात इरफानने दरोडेखोराची भूमिका साकारली आहे. यात त्याच्या आयुष्यातील घडामोडींमुळे तो एक अ‍ॅथलेट असून देखील दरोडेखोर कसा बनतो? याचे उत्तम दर्शन घडते. शोले - अमजद खान
‘सोजा नही तो गब्बर सिंग आ जायेगा’ हा ‘शोले’ मधील डायलॉग आठवतो ना? अमजद खानने साकारलेला दरोडेखोर आपल्या नेहमी आठवणीत राहणारा आहे. शोले चित्रपटापासून दरोडेखोर किती वाईट असू शकतो? याची जाणीव आपल्याला झाली. गंगा जमुना - दिलीप कुमार
बॉलिवूड लिजेंड दिलीप कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या. तत्कालीन युवतींच्या मनात केवळ एकच नाव असायचे. ते म्हणजे दिलीप कुमार यांचे. मात्र, गंगा जमुना रिलीज झाला आणि त्यात त्यांनी साकारलेली दरोडेखोराची भूमिका पाहिल्यावर त्यांच्यातील उत्कृष्ट कलाकाराची आपल्याला जाणीव होते. 

बँडिट क्वीन- सीमा बिस्वास
एक अभिनेत्री आणि दरोडेखोराच्या भूमिकेत? कशी वाटेल? पण, होय अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी फुलन देवीची भूमिका चित्रपटात साकारली होती. ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. 
Web Title: 'These' Bollywood stars hit the robber!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.