बॉलिवूडच्या स्टारची लव्हस्टोरी कायमच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय असते. एखाद्या कलाकाराचं बॉलिवूडच्या दुस-या एखाद्या कलाकारावर प्रेम जडलं तर ते त्याच कलाकाराशी लग्नही करतात. बॉलिवूडमध्ये तर प्रेम, लग्न आणि घटस्फोट याचीही खुमासदार चर्चा रंगते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या कलाकाराचं लग्न मोडलं तर त्याची सर्वाधिक चर्चा रंगते.तो कलाकार जर रसिकांच्या गळ्यातला ताईत असेल तर या चर्चा आणखीच रंगतात. चला तर जाणून घेऊ हिंदी चित्रपटसृष्टीतील चर्चित घटस्फोट जे बनले चर्चेचा विषय.

Also Read:या कलाकारांनी तिहेरी तलाक नव्हे तर न्यायालयीन घटस्फोटावर ठेवला विश्वास

 


हृतिक रोशन आणि सुझॅन खान

 
हृतिक आणि सुझॅन यांनी एकमेकांपासून काडीमोड घेतला तेव्हा कुणाचाही त्यावर विश्वासच बसला नाही. बॉलिवूडचे बेस्ट कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जायचं. शिवाय दोघंही बालपणीचे मित्र होते. दोघांचा तेरा वर्षाचा संसार 2013 मध्ये संपुष्टात आला. हृतिकपासून वेगळं होण्यासाठी सुझॅननं त्याच्याकडून 400 कोटी रुपयांची पोटगी मागितली होती अशा चर्चाही रंगल्या. मात्र 380 कोटी पोटगी देण्यास हृतिक मान्य झाल्याचं बोललं जातंय. हृतिक आणि सुझॅनचा घटस्फोट बॉलिवूडचा चर्चित घटस्फोट आहे.
 
 


करिष्मा कपूर – संजय कपूर
 
बॉलिवूडची अभिनेत्री करिष्मा कपूर ही आपला पती संजय कपूरपासून वेगळी झालीय. करिष्माने घटस्फोटानंतर संजयच्या वडिलांचा मुंबईतील बंगला आणि मुलांच्या पालनपोषणासाठी प्रति महिना 10 लाखाचा खर्च घेतला. शिवाय स्वतःसाठी 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केली होते.
 
 


आदित्य चोप्रा – पायल खन्ना
 
बॉलीवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यानं अभिनेत्री रानी मुखर्जीसह संसार थाटला. मात्र रानीशी लग्न करण्याआधी आदित्यचे पायल खन्ना हिच्याशी लग्न झालं होतं. आदित्य आणि पायलनं एकमेंकांपासून वेगळे होण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढली.घटस्फोटाचा हा खटला कोर्टात बराच काळ चालला. कारण पायलनं पोटगी म्हणून आदित्यकडून जास्त पैशांची मागणी केली होती. अखेरीस पायलला ते मिळाले. मात्र तिला किती पैसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बॉलीवुडमधील सगळ्यात महागडा घटस्फोट असल्याचे बोललं जात आहे.
 
 


आमिर खान – रिना
 
मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि रिना दत्ता यांनी आपल्या पालकांच्या मर्जीविरोधात जाऊन लग्न केलं होतं. 1986 साली दोघं रेशीमगाठीत अडकले आणि 2002 साली त्यांनी काडीमोड घेतला. आमिरपासून वेगळं होण्यासाठी रिनानं 50 कोटी रुपये पोटगी मागितल्याचं सांगण्यात येतं.
 


संजय दत्त – रिया पिल्लई
 
संजय दत्त आणि रिया हे कपल 1986 साली वेगळं झालं. या काळात दोघंही वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी रिया टेनिस स्टारसह रिलेशनशिपमध्ये होती तर संजय दत्त मान्यतावर फिदा होता. अखेर संजय आणि रिया यांचा घटस्फोट झाला.संजयनं रियाला 8 कोटी रुपये पोटगी दिली. शिवाय त्याने तिला एक आलिशान कारही भेट दिली.

 

अमृता सिंह - सैफ अली खान

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यात वयाचे अंतर असल्याने सैफ अली खानच्या घरातील अनेकजण या दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते. सैफने त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमृतासोबत लग्न करणे त्यांना रुचले नव्हते. पण घरातल्यांच्या विरोधात जाऊन सैफने १९९१ मध्ये अमृतासोबत लग्न केले. २००४ मध्ये रोझी ही इटलीमधील मॉडेल सैफच्या आयुष्यात आली आणि सैफ-अमृताने वेगळे व्हायचे ठरवले. सैफने अमृताला पाच करोड रुपयांची पोटगी देऊन घटस्फोट दिल्याचे बोलले जाते.

 


प्रभूदेवा – रामलाथ
 
बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर आणि दिग्दर्शक प्रभूदेवा यानं पत्नी रामलाथ हिच्याशी 2011 साली काडीमोड घेतला. प्रभूदेवानं रामलाथला 10 लाख रुपये, दोन महागड्या कार आणि 25 कोटी रुपयांचा व्हिला पोटगीदाखल दिला.
Web Title: These are the most expensive and popular divorce in Bollywood!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.