This Telugu actor will make her debut in Bollywood | ही तेलगू अभिनेत्री या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

गेल्या काही वर्षात लहान पडद्यावर काम करणार्‍या अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्येही आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. त्यातही मराठी, तेलगू अशा चित्रपटसृष्टीतून आलेल्या अभिनेत्रीही बॉलिवूडमध्ये पाय रोवून उभ्या आहेत. आता अशीच एक तेलगू अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वृषाली गोसावी असं या अभिनेत्रीचं नाव असून ‘वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री’ या हिंदी चित्रपटातून ती प्रेक्षकांना भेटणार आहे. निर्माते पी.अभय कुमार यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशीच या चित्रपटाची घोषणा केली असून या महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरुवात होणार आहे.लघुपट बनवण्यातही अभय कुमार अग्रेसर असतात. क्राईम, विनोदी, भयपट, ड्रामा, रोमान्स अशा विविध विषयांवर त्यांनी आजवर चित्रपट बनवले आहेत.'यू ब्लडी फूल', 'बद्रीनाथ एलएलबी', 'टीट फॉर टॅट 2', 'लव्हर बॉय', 'ब्लाईंड लव्ह' अशी कित्येक कलाकृती त्यांनी एसपी फिल्म्स अंतर्गत सादर केली आहेत. आता त्यांचा ‘वो कौन है- दि मर्डर मिस्ट्री’ हा नवा चित्रपट येणार आहे.डी.के.बर्नवाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून विजू खोटे, विजय कदम, मुकेश तिवारी, विजय पाटकर, वृषाली गोसावी आदी कलाकार मंडळी या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच मे महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार असल्याचेही सांगण्यात अाले अाहे.


मराठी भाषिक असलेल्या वृषालीने तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती.निलिमल्लाय, श्रीमतीबेंगरम या तेलगू चित्रपटांमध्ये वृषाली याआधी झळकली आहे. तसंच, अनेक अ‍ॅड फिल्म्स आणि शॉर्ट्स फिल्मसही तिने केल्या आहेत. तेलगूमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर वृषाली आता बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यास सज्ज झाली आहे. पी.अभयकुमार यांनी ‘वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटातून वृषालीला ही संधी दिली आहे.‘मी चांगल्या हिंदी चित्रपटाच्या शोधातच होते. पी.अभय कुमार यांनी मला या चित्रपटाच्या निमित्ताने संधी दिली आहे.बॉलिवूडमध्ये काम करण्याची प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असतेच. माझीही होती. पण वो कौन हैच्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण झालीय. त्यामुळे आता चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या प्रतिक्षेत आहे मी. दिग्दर्शक डी.के.बर्नवाल यांच्याकडूनही बर्‍याच गोष्टी शिकायच्या आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी मी फार उत्सूक आहे,’ असे वृषाली गोसावी हिने सांगितलं.







Web Title: This Telugu actor will make her debut in Bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.