First Look : लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गुढ उलगडणार! लवकरच येतोय ‘द ताश्कंद फाईल्स’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:54 PM2019-03-22T13:54:26+5:302019-03-22T14:01:21+5:30

होय, मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित आहे, हे सांगणे नकोच.

the tashkent files who killed shastri poster trailer launch on 25 march | First Look : लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गुढ उलगडणार! लवकरच येतोय ‘द ताश्कंद फाईल्स’!!

First Look : लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गुढ उलगडणार! लवकरच येतोय ‘द ताश्कंद फाईल्स’!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘द ताश्कंद फाईल्स’ हा सिनेमा शास्त्रींच्या या गूढ मृत्यूवर आधारित आहे.  येत्या २५ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. 

कदाचित २०१९  हे वर्ष राजकीय चित्रपटांसाठी स्मरणात राहिल. याच वर्षात ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट प्रदर्शित झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरचा ‘ठाकरे’ हा चित्रपटही याच वर्षात आपण पाहिला. लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. शिवाय ‘एनटीआर’चे बायोपिकही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आता या राजकीय चित्रपटांच्या यादीत आणखी एक नाव चढले आहे. होय, मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित आहे, हे सांगणे नकोच.




रशियाच्या दबावानंतर शास्त्रीजींनी पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत द्यायच्या करारावर सह्या केल्या. ताश्कंद करार या नावाने तो करार जाहीर झाला. ताश्कंद मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांच्या सोबत युद्ध समाप्त करार केल्यानंतर केवळ १२ तासांत ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’ हा सिनेमा शास्त्रींच्या या गूढ मृत्यूवर आधारित आहे.  येत्या २५ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. 






मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतच नसीरूद्दीन शहा, श्वेता बसू प्रसार, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी आणि अंकुर राठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटासाठी टीमने तीन वर्षे संशोधन केले. गतवर्षी याच चित्रपटाच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून लाल बहादूर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूबाबतची तथ्ये टीमसोबत शेअर करण्यात येण्याची विनंती करण्यात आली होती. 

Web Title: the tashkent files who killed shastri poster trailer launch on 25 march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.