तारा सुतारिया आऊट; आता ‘अर्जुन रेड्डी’मध्ये ‘ही’ बनणार शाहिद कपूरची हिरोईन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 08:28 PM2018-09-24T20:28:47+5:302018-09-24T20:30:40+5:30

‘अर्जुन रेड्डी’च्या हिंदी रिमेकसाठी मेकर्सनी शाहिदच्या अपोझिट तारा सुतारिया हिला साईन केले होते. पण नंतर तारा सुतारिया या चित्रपटातून आऊट झाल्याची बातमी आली. त्यामुळे तारा सुतारियाच्या जागी या चित्रपटात कुण्या हिरोईनची वर्णी लागते, याकडे सगळयांचे लक्ष लागले होत.

tara sutaria replaced by kiara advani in the hindi remake of arjun reddy starring shahid kapoor | तारा सुतारिया आऊट; आता ‘अर्जुन रेड्डी’मध्ये ‘ही’ बनणार शाहिद कपूरची हिरोईन!!

तारा सुतारिया आऊट; आता ‘अर्जुन रेड्डी’मध्ये ‘ही’ बनणार शाहिद कपूरची हिरोईन!!

googlenewsNext

विजय देवरकोंडाला तेलगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची जोरदार तयारी सुरू आहे. आपण जाणतोच की, या रिमेकमध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी मेकर्सनी शाहिदच्या अपोझिट तारा सुतारिया हिला साईन केले होते. पण नंतर तारा सुतारिया या चित्रपटातून आऊट झाल्याची बातमी आली. डेट्स नसल्यामुळे ताराने हा चित्रपट सोडल्याचेही कळले होते. त्यामुळे तारा सुतारियाच्या जागी या चित्रपटात कुण्या हिरोईनची वर्णी लागते, याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. ताज्या बातमीनुसार, मेकर्सने ताराच्या जागी शाहिदच्या अपोझिट लीड अ‍ॅक्ट्रेसचे नाव फायनल केले आहे. होय, शाहिदच्या अपोझिट या चित्रपटात कियारा अडवाणीची वर्णी लागल्याची खबर आहे. लवकरच ती आणि शाहिद या चित्रपटाचे शूटींग सुरू करणार आहेत. कियारा सध्या रामचरणसोबत एका तेलगू प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.
‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट एका नशेच्या आहारी गेलेल्या एका डॉक्टरच्या प्रेमाची कथा आहे. तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ला तरूणाईने डोक्यावर घेतले होते. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटानंतर त्याची लोकप्रीयता कमालीची वाढली होती. ४ कोटी बजेटच्या या चित्रपटाने ५२ कोटींचा बिझनेस केला होता. आता विजय देवरकोंडाने साकारलेली हीच भूमिका शाहिद साकारणार आहे. आता शाहिदचा हा चित्रपट येत्या दिवसांत बॉक्सआॅफिसवर काय कमाल दाखवतो, ते बघूच. तेलगू भाषेतील ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे.   संदीप हाच या चित्रपटाचा हिंदी रिमेक दिग्दर्शित करणार आहे.

Web Title: tara sutaria replaced by kiara advani in the hindi remake of arjun reddy starring shahid kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.