Tapsee Pannu will be seen in 'Game Over' movie | आता तापसी पन्नू करणार सर्वांचा 'गेम अोव्हर'
आता तापसी पन्नू करणार सर्वांचा 'गेम अोव्हर'

ठळक मुद्देतापसी पन्नू 'गेम ओव्हर' सिनेमात मुख्य भूमिकेत

   
पिंक फेम अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडसोबतच तमीळ सिनेसृष्टीत देखील काम करते आहे. नुकतेच तिने सांगितले की, याबद्दल लवकरच ती घोषणा करणार आहे. तापसीचा आगामी तमीळ सिनेमा 'गेम ओव्हर'चा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये तापसी पन्नू एका व्हिलचेअरवर बसली असून तिच्या पायाला प्लास्टर दिसते आहे. या सिनेमाच्या शीर्षकवरून हा सिनेमा प्रेम कहाणीवर आधारीत असेल असे वाटते आहे. 
वाय नॉट स्टुडिओजच्या अधिकृत ट्विटर पेजवर गेम ओव्हर सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. तमीळ व तेलगू भाषेत बनत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एण्टरटेन्मेंटने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन श्रवण करत आहेत. 
 बॅडमिंटनपटू मिथियास बोयबरोबर तापसी रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्याबरोबर लग्न करण्याच्या प्रश्‍नाला मात्र तापसीने नकारार्थी उत्तर दिले आहे. तापसी म्हणाली की इतक्‍या लवकर लग्न करायचे नाही. सध्या तर नवीन सिनेमांच्या खूप चांगल्या ऑफर येत आहेत. त्यामुळे सध्या तरी आपल्या फिल्मी करियरवरच लक्ष केंद्रित करायचे आहे.तापसी व मिथियास यांनी हिल स्टेशनवर सुट्टी एन्जॉय केल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. मिथियासबरोबर तापसी कधीपासून रिलेशनशीपमध्ये आहे आणि लग्नाबाबतचा तिचा प्लान काय आहे, या सगळ्या गोष्टींबाबत तिने काहीही सांगितले नाही.
तिचा नुकताच मनमर्जिया हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सध्या ती खूप खूश आहे. 
 

English summary :
Pink Fame actress Tapasasi Pannu's Tamil movie 'Game Over' poster has just been shared on social media. The film is being produced in Tamil and Telugu language by Reliance Entertainment. Ashwin Shravan directing this movie.


Web Title: Tapsee Pannu will be seen in 'Game Over' movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.