Tanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 09:20 PM2018-10-19T21:20:09+5:302018-10-19T21:20:36+5:30

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादात  सिने अ‍ॅण्ड टीव्ही असोसिएशनने (सिन्टा) घेतलेल्या भूमिकेवर तनुश्री दत्ताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Tanushree Dutta controversy:tanushree dutta slams cintaa for not taking strict action against nana patekar | Tanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का?

Tanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का?

googlenewsNext

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादात  सिने अ‍ॅण्ड टीव्ही असोसिएशनने (सिन्टा) घेतलेल्या भूमिकेवर तनुश्री दत्ताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मीटू’वर सिन्टाने घेतलेल्या निर्णयांवरही तनुश्रीने नाराजी बोलून दाखवली आहे. केवळ इतकेच नाही तर सिन्टाने मला पुन्हा एकदा फेल केले, अशी उद्विग्न प्रतिक्रिया तिने दिली आहे.
नाना पाटेकरप्रकरणी सिन्टाने जी काही भूमिका घेतली, ती पाहून मी निराश आहे.  १० वर्षांपूर्वी माझ्या तक्रारीची योग्य दखल न घेतल्यावर अलीकडे सिन्टाने माझी माफी मागितली होती. यावेळी नाना पाटेकर यांना सिन्टातून निष्कासित करण्यासोबतचं गणेश आचार्य, निर्माता सीमी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याविरोधात कठोर कारवाई करू, असे मला सिन्टाकडून सांगण्यात आले होते. तुम्ही मला याप्रकरणात कायदेशीर मदत करू शकाल का? अशी विचारणा मी सिन्टाकडे केली होती. पण सिन्टाने माझी मदत करण्यास नकार दिला. कायदेशीर प्रकरणात मदत करण्याचे आमचे धोरण नाही, असे त्यांनी मला सांगितले. यावरून तरी सिन्टाने मागितलेली माफी, ‘मीटू’ला दिलेला पाठींबा सगळे काही मीडियाला दाखवण्यासाठी आहे, असे मला वाटते. हे लोक केवळ मोठ-मोठ्या बाता मारत आहेत. मोठ-मोठे प्रॉडक्शन हाऊस ‘मीटू’मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत असताना सिन्टाची कारवाई हास्यास्पद आहे. अशा संस्था जराही विश्वासार्ह नाहीत, सिन्टाने मला पुन्हा एकदा अपयशी ठरवले, असे तनुश्री दत्ता म्हणाली.
तनुश्रीने फॉक्स स्टारबद्दलही नाराजी व्यक्त केली. ‘अक्षय कुमार आणि फॉक्स स्टारच्या आक्षेपानंतर नाना पाटेकर ‘हाऊसफुल 4’मधून बाहेर झाले असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या. पण आता एक वेगळीच बातमी येतेय. त्यांनी ६ दिवस शूट केलेले सीन्स चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. नानाचे सीन्स चित्रपटात राहणार असतील तर हा कसला सपोर्ट? काय फक्त स्वत:चा उदोउदो करण्यासाठी नानाला या चित्रपटातून काढले गेले?’ असा सवाल तनुश्रीने केला.
तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. दहा वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवरची ही घटना आहे.

Web Title: Tanushree Dutta controversy:tanushree dutta slams cintaa for not taking strict action against nana patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.