'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 07:00 PM2019-01-21T19:00:00+5:302019-01-21T19:00:00+5:30

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत आणि आर माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला 'तनू वेड्स मनू'चा तिसरा भाग लवकरच येणार आहे.

'Tanu Weds Manu 3' Soon, Kangana Ranaut confirmed this News | 'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म

'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म

googlenewsNext
ठळक मुद्दे'तनू वेड्स मनू'चा तिसरा भाग लवकरच दिग्दर्शक आनंद राय यासंदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करतील

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत आणि आर माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला 'तनू वेड्स मनू'चा तिसरा भाग लवकरच येणार आहे. कंगनाने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २०११ साली आलेला ‘तनू वेड्स मनू’ बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला. त्यानंतर २०१५ साली या चित्रपटाचा सीक्वलही आला. तोही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता चार वर्षांनंतर याचा तिसरा भागही येणार असल्याची खुशखबर कंगनाने दिली आहे. मणिकर्णिका प्रदर्शित झाल्यानंतर 'तनू वेड्स मनू ३' चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात येईल असे कंगनाने सांगितले आहे.

मणिकर्णिकाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाने दिलेल्या मुलाखतीत 'तनू वेड्स मनू ३' येणार असल्याची माहिती दिली आहे. दिग्दर्शक आनंद राय यासंदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करतील असेही कंगना म्हणाली. गेल्या वर्षभरात कंगना मणिकर्णिकाच्या तर आनंद राय झिरोच्या चित्रीकरणात व्यग्र होते. त्यामुळे चित्रपटासंबधीत कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत मात्र लवकरच तिसऱ्या भागाच्या स्क्रिप्टवर काम सुरू होईल अशीही माहिती कंगनाने दिली.

कंगना राणौत सध्या 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात बिझी आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली.

आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटाच्या रिलीजची. येत्या २५ तारखेला कंगनाचा हा बिग बजेट चित्रपट रिलीज होतोय. कंगना व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी आणि वैभव तत्त्ववादीची मणिकर्णिकामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. मणिकर्णिका'  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: 'Tanu Weds Manu 3' Soon, Kangana Ranaut confirmed this News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.