Taimur is trying to tell his father Saif Ali Khan | ​तैमुर काय सांगायचा प्रयत्न करतोय त्याचे बाबा सैफ अली खानला

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर हा सध्या मीडियाचा चाहता झाला आहे. त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी उत्सुक असतात. नुकतेच त्याला एका पार्टीवरून परतताना कॅमेऱ्यात टिपण्यात आले. ही पार्टी तैमुरच्या आत्याची होती. तैमुरची आत्या सोहा अली खानचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या पार्टीत तैमुरने त्याच्या आई-वडिलांसोबत उपस्थिती लावली होती. 
सोहा अली खानचा हा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास आहे. कारण तिच्या आयुष्यात काहीच दिवसांपूर्वी एका नन्ही परीचे आगमन झाले. सोहाला नुकतेच ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यावेळी कुणाल खेमू आपल्या मुलीला कॅमेऱ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता. सोहा सध्या एकदम फिट असून तिने वाढदिवस तिचा खूप चांगल्याप्रकारे साजरा केला. कुणालने त्यांची ही गुड न्यूज मीडियाला दिली होती. कुणालने ट्वीटद्वारे त्यांच्या फॅन्सना ही बातमी सांगितली होती. कुणालने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, नवरात्रीच्या पवित्र दिवसांत आमच्या घरात छोट्याशा परीचे आगमन झाले आहे. सोहा आणि आमच्या मुलीची दोघांचीही तब्येत चांगली आहे. सोहा अली खान आणि कुणाल खेमू या दाम्पत्याने नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या चिमुकलीचे नाव इनाया नाओमी खेमू असे ठेवले आहे. सोहा तिच्या मुलीच्या आगमनाने प्रचंड खूश आहे. तिने तिचा हा वाढदिवस तिच्या मुलीसोबत आणि पती अभिनेता कुणाल खेमुसोबत सेलिब्रिट केला. 
तिच्या वाढदिवसाच्या या पार्टीतून सैफ, तैमुर आणि करिना बाहेर पडले असता कॅमेऱ्यांनी त्याला टिपले. तैमूरला सैफने उचलून घेतले होते. या फोटोत तैमुरचे एक्सप्रेशन पाहाता तो त्याच्या वडिलांना काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे आपल्याला दिसत आहे. सैफ आणि तैमुरमधील या संवादाबाबात सोशल मीडियावर देखील चर्चा आहे.
या पार्टीला सैफ आणि करिना दोघांनीही एकदमच कॅज्युअल कपडे घातले होते. त्यांच्या तुलनेत नेटिझनना तैमुरचे कपडे आवडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Also Read : ​तैमुरबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर का भडकला सैफ अली खान?
Web Title: Taimur is trying to tell his father Saif Ali Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.