तैमूर अली खानची लोकप्रियता शेजाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी! पोलिसांत केली तक्रार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 11:17 AM2019-05-05T11:17:52+5:302019-05-05T11:18:37+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. पण त्याची ही लोकप्रियताच त्याच्या शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. इतकी की, हे शेजारी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले.

taimur ali khans popularity become headache for the neighbors police complaint | तैमूर अली खानची लोकप्रियता शेजाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी! पोलिसांत केली तक्रार!!

तैमूर अली खानची लोकप्रियता शेजाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी! पोलिसांत केली तक्रार!!

googlenewsNext
ठळक मुद्देदरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात.

सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. पण त्याची ही लोकप्रियताच त्याच्या शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. इतकी की, हे शेजारी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तैमूर अली खानबद्दल नाही पण त्याचे फोटो घेण्यासाठी गोंधळ घालणाºया पापाराझींविरोधात तक्रार दाखल केली.

तैमूरचे फोटो घेण्यासाठी रोज बिल्डींगसमोर पापाराझींची गर्दी असते. रोज संध्याकाळी या बिल्डींगसमोर जणू पापाराझींची जत्रा भरते. त्यांच्याकडून होणारा गोंधळ, आवाज यामुळे बिल्डिंगमधील सगळेच वैतागले. अखेर या रोजच्या कटकटीला कंटाळून बिल्डिंमधील लोकांनी पापाराझींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला सैफनेच ही तक्रार ाखल केल्याचे मानले गेले. पण अलीकडे एका मुलाखतीत खुद्द सैफने याचा इन्कार केला.
या तक्रारीची दखल घेत, पोलिसांनी सैफ व करिनाच्या घरासमोर उभ्या राहणाºयांना पापाराझींना मज्जाव केला. अर्थात घराबाहेर नाही पण तैमूर जिथे जाईल तिथे त्याचा पाठलाग करण्याचा पापाराझींचा खटाटोप मात्र अद्यापही थांबलेला नाही.

तैमूर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा कोण करतेय? गतवर्षी बाजारात आलेला तैमूर बाहुला तुम्हाला आठवत असेलच. केरळच्या एका मार्केटमध्ये तैमूरच्या चेहºयाचा बाहुला लोकप्रिय झाला होता.यानंतर तैमूरच्या नावाची बिस्किटे मार्केटमध्ये लोकप्रिय झाली आहेत.

Web Title: taimur ali khans popularity become headache for the neighbors police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.