आता या दिग्दर्शकाने दिली तैमुरला चित्रपटात काम करण्याची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:36 PM2019-04-26T12:36:49+5:302019-04-26T12:37:49+5:30

तैमुर हा लहानवयातच स्टार बनला आहे. तो कुठेही जातो, तिथे प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्याच्यामागे फिरत असतात.

Taimur Ali Khan Gets Bollywood Movie offer | आता या दिग्दर्शकाने दिली तैमुरला चित्रपटात काम करण्याची ऑफर

आता या दिग्दर्शकाने दिली तैमुरला चित्रपटात काम करण्याची ऑफर

googlenewsNext
ठळक मुद्देस्टुटंड ऑफ द इयर या चित्रपटाचा 10 वा भाग बनवण्यात आला तर या चित्रपटाचा नायक कोण असेल याविषयी त्याने सांगितले आहे. स्टुटंड ऑफ द इयर 10 या चित्रपटाचा नायक तैमुर असेल असे त्याने मुलाखतीत सांगितले आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूरचातैमुर हा त्यांच्या दोघांपेक्षा देखील फेमस आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तैमुर हा लहानवयातच स्टार बनला आहे. तो कुठेही जातो, तिथे प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्याच्यामागे फिरत असतात. तैमुर हा मीडियाचा प्रचंड फेव्हरेट बनला आहे. त्याला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून तैमुरच्या फॅन्सने त्याचे फोटो पोस्ट करण्यासाठी इन्स्टाग्रामवर अनेक अकाऊंटस देखील बनवली आहेत. करिना कपूर आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या गुड न्यूज या चित्रपटाद्वारे  तैमुर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा रंगली होती. पण या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले जात आहे.

स्टुंडट ऑफ द इयर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाद्वारे करण जोहरने आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांना लाँच केले होते. या पहिल्याच चित्रपटाने या सगळ्यांना स्टार बनवले. आलिया आणि वरुण यांनी तर आज बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडला इतके स्टार दिल्यानंतर आता  या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 

स्टुडंट ऑफ द इयर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाद्वारे करण जोहर काही नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबतच या चित्रपटात तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

स्टुटंड ऑफ द इयर 2 या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक पुनित मल्होत्राने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार स्टुटंड ऑफ द इयर या चित्रपटाचा 10 वा भाग बनवण्यात आला तर या चित्रपटाचा नायक कोण असेल याविषयी पुनितने सांगितले आहे. स्टुटंड ऑफ द इयर 10 या चित्रपटाचा नायक तैमुर असेल असे त्याने मुलाखतीत सांगितले आहे. यावरून तैमुरला लहानपणीच चित्रपटाच्या ऑफर्स यायला लागल्या आहेत असेच म्हणावे लागेल.

Web Title: Taimur Ali Khan Gets Bollywood Movie offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.