Tabu was ready to make a film in 'this' movie, without having read the script | 'या' चित्रपटात कॅमिओ करायलाही तब्बू होती तयार, स्क्रिप्ट वाचल्याशिवाय दिला होकार

रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेनचा ट्रेलर कालच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या चित्रपटातून अजन देवगण, परिणीती चोप्रा, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, श्रेयस पळपदे, कुणाल खेमू आणि तुषार कपूर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहेत. ट्रेलर लाँच दरम्यान तब्बू सांगितले की तिने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्याशिवाय तिने होकार दिला होता. ती पुढे म्हणाली कि मी गोलामाल सीरिजचा भाग बनण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे जेव्हा ही संधी तिला मिळाली तेव्हा तिने लगेच होकार दिला. हा चित्रपट तब्बूसाठी खास असल्याचे तिचे म्हणणे आहे. जेव्हा ही ती गोलमाल सीरिजचा कोणताही चित्रपट बघते तेव्हा ती हसू अनवार होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे याआधी जेव्हा जेव्हा ती रोहित शेट्टीला भेटायची मला गोलमाल सीरिजचा भाग बनायची इच्छा असल्याचे सांगायची. मी या चित्रपटात कॅमिओ करायलादेखील तयार असल्याचे तिचे म्हणणे असायचे. गोलमालच्या सेटवर पिकनिक सारखे वातवरण असायचे असे तब्बूने सांगितले आहे. 

ALSO READ : watch : ​कॉमेडी अन् हॉररचा तडका असलेला ‘गोलमाल अगेन’चा ट्रेलर पाहाच!

गोलमाल सीरिजच्या चौथ्या भागात तब्बू अजय देवगणच्या टीममध्ये दिसणार आहे. तसेच करिना कपूर खानला रिप्लेस करत यात तिच्या जागा परिणीती चोप्राने घेतली आहे. परिणीता न्यूयॉर्कमध्ये असताना रोरहित शेट्टीने कॉल करुन चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. परिणीती सांगते काही काळ मला या गोष्टीवर विश्वासच बसला नव्हता. 

अजय देवगण आणि रोहित शेट्टीचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर 19 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या आधीचे गोलमाल सीरिजचे सगळे भाग बॉक्स ऑफिसवर हिट गेले आहेत. त्यामुळे गोलमाल अगेनसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करेल अशी आशा चित्रपटाच्या निर्मात्याला आणि सगळ्या टीमला नक्कीच असेल. गोलमालसोबत आमिर खानचा  सीक्रेट सुपरस्टार ही रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर  'गोलमाल अगेन' आणि सीक्रेट सुपरस्टारमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे. गोलमालनंतर रोहित शेट्टी रणवीर सिंगला घेऊन चित्रपटात तयार करणार असल्याचे कळते आहे. 

Web Title: Tabu was ready to make a film in 'this' movie, without having read the script
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.