तापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा

By गीतांजली | Published: June 3, 2019 06:00 AM2019-06-03T06:00:00+5:302019-06-03T06:00:00+5:30

तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Taapsee Pannu challenge herself for every character | तापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा

तापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्दे''मी स्वत:ला प्रत्येक भूमिकेसाठी चॅलेंज देते''''सिनेमा सिलेक्ट करतानाही प्रेक्षकांच्या भूमिकेतून बघते''

गीतांजली आंब्रे 

तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'पिंक' सिनेमामधून. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. लवकरच तापसीचा 'गेम ओव्हर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तापसीशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा 

गेम ओव्हरचा ट्रेलरचा खूप इंटस्टेटिंग आहे ?, सिनेमाच्या कथेबाबत काय सांगशील?
या पद्धतीचा सिनेमा तु्म्ही या आधी कधी बघितला नसेल. याची गॅरेंटी आम्ही घ्यायला तयार आहोत. ज्यावेळी मला या सिनेमाची कधी ऐकवण्यात आली तेव्हा मला कळतंच नव्हतं याला कोणत्या जॉनरचा सिनेमा म्हणू. गेम ओव्हरमध्ये एकाच भूमिकेला अनेक शेड्स आहेत त्यामुळे तुम्हाला पूर्णवेळ सिनेमा खिळवून ठेवेल. सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे आणि मला ती तशीच ठेवायची आहे. 

या भूमिकेसाठी तू कशा पद्धतीने तयारी केलीस?
मला माहिती होते ही भूमिका करताना माझी कसोटी लागणार आहे. माझ्यासाठी ही भूमिका साकाराणं मानसिक आणि शारिरीक पातळीवर आव्हानात्मक होते. कारण जवळ पास 60 टक्के सिनेमा हा व्हिलचरवर बसूनच होता आणि मला साधं कधी फॅक्चर सुद्धा झाले नव्हते. त्यामुळे व्हिलचरवर बसून अभिनय करणे माझ्यासाठी खरंच खूप कठीण होते. 35 दिवस मी रोज त्या भूमिकेत स्वत:ला समावून घेतले होते आणि मग शूटिंगसाठी सज्जा असायची.
 

पिंक, मुल्क, मनमर्जिया आणि बदला प्रत्येक सिनेमात तुझ्या भूमिकेला एक वेगळी शेड्स आहे आणि या सगळ्या भूमिका तू अगदी सहजपणे साकारल्या आहेस याबाबत जाणून घ्यायला आवडेल ?
माझ्या सगळ्या सिनेमांचे दिग्दर्शक फार चांगले होते त्यामुळे कदाचित त्यांनी माझ्याकडून चांगला अभिनय करुन घेतला. त्याचे दुसरं कारण असे ही असू शकतं की मी असेच सिनेमा करते जे करताना मला मजा आली पाहिजे. सिनेमा सिलेक्ट करतानाही प्रेक्षकांच्या भूमिकेतून बघते हा सिनेमा मला प्रेक्षक म्हणून बघायला आवडेल का?, तसेच सिनेमा करताना माझ्या प्रत्येक भूमिकेबाबत उत्सुक असते मी स्वत:ला प्रत्येक भूमिकेसाठी चॅलेंज देते. मला लहानपणापासून एक्सपेरिमेंट करायला आवडतात तेच सध्या मी सिनेमात करतेय. कधी कधी यशस्वी होतात आणि त्याने आयुष्य जगायला मजा येते म्हणून कदाचित मी वेगवेगळ्या भूमिका करताना दिसते. 

पुढे जाऊन तुला प्रॉडक्शन किंवा दिग्दर्शन करायला आवडेल का ?
सध्या तरी मी अभिनयावरचं लक्ष केंद्रीत केेले आहे. एक गोष्ट मी मनाशी पक्की केलीय ती म्हणजे कोणत्याच गोष्टीशीसाठी कधी नाही म्हणू नका. कारण लहानपणापासून मी नेहमी म्हणायचे  मला अभिनेत्री बनयाचं नाहीयं आणि आज मी तेच बनलीय. मात्र सध्या माझ्याकडे दिग्दर्शन किंवा प्रॉडक्शन हाऊन ओपन करण्याचा कोणताच प्लॉन नाहीय. पण भविष्यात जरा बनला तरी मी नक्की सांगेन. 

इंजिनिअरिंग, मॉडलिंग ते अभिनेत्री या संपू्र्ण प्रवासकडे तू कशी बघतेस ?
मला वाटते आयुष्यात प्लॉन करुन कधीच काही होतं नसतं. काही गोष्टी तुम्हाला नशिबानी मिळतात पण आलेली कोणतीच संधी सोडून नका. प्रत्येक गोष्ट ट्राय करा मीही तेच करुन आज या ठिकाणी पोहोचले आहे. मला या गोष्टीचे समाधान आहे की आज जे काही मी मिळवलंय ते स्वत:च्या हिमतीवर. 
 

Web Title: Taapsee Pannu challenge herself for every character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.