Swara Bhaskar's 'You Turn'; Say, that letter is foolishness !! | ​स्वरा भास्करचा ‘यु टर्न’; म्हणे, ते पत्र म्हणजे मुर्खपणा!!

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लिहिलेले एक खुले पत्र अलीकडे चांगलेच गाजले. ‘पद्मावत’ पाहिल्यानंतर स्वराने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना खुले पत्र लिहिले होते. हे पत्र चांगलेच वादग्रस्त ठरले होते.
‘पद्मावत’मध्ये सतीप्रथेचे अर्थात ‘जौहर’चे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप स्वराने या पत्रात केला होता. ‘पद्मावत’मध्ये महिलांची एक वेदनादायी प्रतिमा मांडली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा स्त्रियांना भूतकाळात घेऊन गेला.  स्त्रियांना, विधवांना, बलात्कार पीडितांना या समाजात पुरुषांच्या संमतीशिवाय मानाने जगण्याचा खरंच अधिकार नाही का?  स्वतंत्र भारतात अशा प्रकारे सती प्रथेचं उदात्तीकरण करणं हा गुन्हा आहे.   तिकीट काढून तुमचा चित्रपट बघणाºया प्रत्येकाला उत्तर देणे तुमची जबाबदारी आहे, असे स्वराने आपल्या खुल्या पत्रात भन्साळींना उद्देशून  लिहिले होते.  स्वराच्या या पत्राने बॉलिवूडमध्ये दोन गट पडले होते. काहींनी स्वराचे समर्थन केले होते तर काहींनी कडवा विरोध. सोशल मीडियावरही स्वरा यावरून ट्रोल झाली होती. प्रसिद्धीसाठी हा सगळा खटाटोप असल्याचे ट्रोलर्सने म्हटले होते. पण हा इतका सगळा एपिसोड गाजल्यानंतर स्वराला म्हणे उपरती झाली आहे. होय, अलीकडे एका मुलाखतीत स्वरा जे काही बोलली त्यावरून तरी हेच वाटते. होय, मोठा वाद निर्माण करणारे हे पत्र म्हणजे, ‘मुर्खपणा’ होता, असे स्वरा या मुलाखतीत म्हणाली. माझ्या पत्रावर इंडस्ट्रीची प्रतिक्रिया पाहून मला त्या पत्राचे हसू आले. आपण कितीही बदलाबद्दल बोलत असू पण उघडपणे बोलणे, ठोस भूमिका घेणे इतके सोपे नाही. माझे बोलणे इतके महत्त्वपूर्ण ठरेल, त्यावर इतका वाद होईल,याची मला कल्पना पण नव्हती, असेही स्वरा म्हणाली.

ALSO READ : ​भन्साळींना खुले पत्र लिहिणा-या स्वरा भास्करने स्वत:बद्दल केला एक मोठा खुलासा!
Web Title: Swara Bhaskar's 'You Turn'; Say, that letter is foolishness !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.