Swara Bhaskar's condition deteriorated further; Sonam Kapoor was married at her 'ha' trouble! | स्वरा भास्करची प्रकृती आणखीनच खालावली; सोनम कपूरच्या लग्नातच तिला झाला होता ‘हा’ त्रास!

अभिनेत्री स्वरा भास्करला बॉलिवूडमध्ये तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखले जाते. नुकतीच ती अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आणि नंतर रिसेप्शन पार्टीत धमाल मस्ती करताना बघावयास मिळाली होती. मात्र या सोहळ्यानंतर तिला प्रकृतीने असे काही घेरले आहे की, तिला घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. डॉक्टरांनी तर तिला पुढील दहा दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, स्वराची प्रकृती आणखीनच बिघडत आहे. 

स्वरा भास्कर सध्या स्लिप डिस्क (कमरेचे दुखणे) या व्याधीने ग्रस्त आहे. त्यामुळे ती तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे प्रमोशनदेखील करू शकत नाही. याबाबतची माहिती स्वत: स्वरानेच एका मुलाखतीदरम्यान दिली आहे. स्वराने आपल्या मुलाखतीत सांगितले की, भारदस्त लहेंगे, प्रचंड काम आणि भावाच्या लग्नाची तयारी यासर्व कारणामुळे मी माझ्या प्रकृतीकडे फारसे लक्ष देऊ शकले नाही. त्यामुळे आज मी अशा स्थितीत पोहोचली आहे, जे म्हातारपणात सोसावे लागत असते. आपल्या या त्रासाबद्दल काही दिवसांपूर्वीच स्वराने सांगितले होते की, डॉक्टरांनी मला सल्ला दिला की, मी दहा दिवस बेड रेस्ट घ्यावी. जर मी असे केले नाही तर, काही दिवसांनी मला पुढील दोन ते आठ आठवडे बेडवरच घालवावे लागतील. दरम्यान, ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात स्वरा भास्कर व्यतिरिक्त करिना कपूर-खान, सोनम कपूर आणि शिखा तल्सानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली जाणार आहे. मात्र स्वरा प्रमोशनमध्ये भाग घेणार नसल्याने त्याचा फटका निर्मात्यांना बसू शकतो. स्वराचा हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Swara Bhaskar's condition deteriorated further; Sonam Kapoor was married at her 'ha' trouble!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.