सुश्मिता सेनने ‘या’ क्रिकेटपटूला म्हटले, ‘आय लव्ह यू’!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 07:14 AM2017-06-22T07:14:59+5:302017-06-22T13:01:02+5:30

सुश्मिता सेन प्रेमात पडलीय. होय, विश्वास बसत नसेल तर सुश्मिताचे हे ताजे ट्विट तुम्ही पाहायला हवे. आता सुश्मिता कुणाच्या ...

Sushmita Sen told the 'cricketer', 'I love you!' | सुश्मिता सेनने ‘या’ क्रिकेटपटूला म्हटले, ‘आय लव्ह यू’!

सुश्मिता सेनने ‘या’ क्रिकेटपटूला म्हटले, ‘आय लव्ह यू’!

googlenewsNext
श्मिता सेन प्रेमात पडलीय. होय, विश्वास बसत नसेल तर सुश्मिताचे हे ताजे ट्विट तुम्ही पाहायला हवे. आता सुश्मिता कुणाच्या प्रेमात पडली, हे तर तुम्हाला कळायलाच हवे. तर सुश्मिता हार्दिक पांड्याच्या प्रेमात पडलीय. होय, होय, क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या. अलीकडे चॅम्पियन ट्राफीच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान हार्दिकची बॅट चांगलीच तळपली होती. ४३ चेंडूंमध्ये ७६ धावा काढत हार्दिकने शानदार खेळी खेळत सगळ्यांचीच मने जिंकलीत. यात सुश्मिताही सामील आहे. हार्दिकचा हा गेम पाहिल्यानंतर सुश्मिता त्याच्यावर अशी काही लट्टू झाली की,तिने त्याला थेट आय लव्ह यू म्हणून टाकले. तेही  ट्विटरवर. 



 
अद्याप हार्दिकने सुश्मिताच्या या ट्विवर उत्तर दिले नाही.पण माजी मिस युनिव्हर्सचा आय लव्ह यू चा मॅसेज पाहून हार्दिकचही कळी खुलली असणार हे नक्कीच. 
सुश्मिता ची लव्ह लाइफ कधीच लपून राहिली नाही. कारण तिने तिच्या नात्याविषयी कधीच कोणापासून लपविले नाही. फार पूर्वी सुश्मिता हॉटेल उद्योजक ऋतिक भसीन याला डेट करीत होती. मात्र त्याच्यासोबत तिचे नाते फार काळ टिकले नाही. अलीकडे तिचे नाव तिच्यापेक्षा लहान वयाच्या मुलासोबत जोडले गेले.  यापूर्वी २०११ मध्येही, सुश्मिता जुहू येथील बिझनेसमॅन इम्तिआज खत्री याला डेट करत असल्याची चर्चा उठली होती. तो तिच्यापेक्षा वयाने खूपच लहान होता. त्यांची भेट गोवा येथे झाली होती.  
त्याहीपूर्वी सुश्मिता  अभिनेता रणदीप हुडा याला डेट करीत होती. त्याच्यासोबत ती खूपच सिरीअस असल्याच्याही बातम्याही त्यावेळेस समोर आल्या होत्या. मात्र त्याच्यासोबतचे नातेही कालांतराने संपुष्टात आले. 
 

Web Title: Sushmita Sen told the 'cricketer', 'I love you!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.