sushmita sen to tie the knot with rumoured boyfriend rohman shawl next year | अखेर सुश्मिता सेनने घेतला निर्णय, लवकरच शुभमंगल!!
अखेर सुश्मिता सेनने घेतला निर्णय, लवकरच शुभमंगल!!

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे सीझन सुरु आहे. सोनम कपूर व आनंद अहुजाच्या लग्नानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग लग्नबेडीत अडकणार आहेत. यापाठोपाठ प्रियांका चोप्रा बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार आहे. याशिवाय मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू आहे. याचदरम्यान आणखी एका कपलच्या लग्नाची कुजबुजही कानावर येतेय. होय, अभिनेता सुश्मिता सेनही लवकरच लग्न करणार, असे कळतेय.
गेल्या काही दिवसांपासून सुश्मिताच्या आयुष्यात एका हॅण्डसम तरूणाने एन्ट्री घेतलीय. हा तरूण कुणी दुसरा नाही तर मॉडेल रोहमन शॉल आहे. सुश्मिता व रोहमन यांच्यातील जवळीक चांगलीच वाढली असून आता या कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचेही कळतेय. दोघांच्याही जवळच्या एका मित्राच्या हवाल्याने डीएनएने याबाबतचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुश्मिता व रोहमन दोघेही दोन महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका फॅशन इव्हेंटमध्ये दोघांचीही भेट झाली आणि पुढे दोघेही एकमेकांच्या पे्रमात पडले. रोहमनने सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले असून सगळे काही जुळून आले तर नव्या वर्षांत दोघेही लग्न करू शकतात. हेच कारण आहे की, अलीकडे सुश व रोहमन दोघेही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. दोघांनीही आपले नाते सार्वजनिक केले आहे.

२७ वर्षांचा रोहमन काही वर्षांपूर्वी मुंबईत शिफ्ट झाला आणि फार कमी वेळात देशातील लीडिंग फॅशन शोजमधील ओळखीचा चेहरा झाला. सध्या रोहमन फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ४२ वर्षांची सुश्मिता रोहमनच्या प्रेमात पडली आहे आणि हे रिलेशनशिप तिने जवळपास कन्फर्म केले आहे. रोहमनने सुश्मिताचं नाही तर तिच्या दोन्ही मुलींचीही मने जिंकली आहेत. अलीकडे सुशने मुलगी रिनीसोबतचा रोहमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

याआधी सुश्मिताचे नाव अनेकांशी जुळले आहे. इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता आणि विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी, मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अक्रम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले.


Web Title: sushmita sen to tie the knot with rumoured boyfriend rohman shawl next year
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.