Sushmita Sen remembers again 'X Boyfriend'; Shared old photo !! | ​सुश्मिता सेनला पुन्हा आठवला ‘एक्स बॉयफ्रेन्ड’; शेअर केला जुना फोटो!!

अभिनेत्री सुश्मिता सेनने आपल्या सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो वेगाने व्हायरल होतोयं. या फोटोत सुश्मिता तिचा कथित बॉयफ्रेन्ड रिकी मार्टिनसोबत दिसतेय. या फोटोतून सुश्मिताने काही जुन्या स्मृतींना उजाळा दिला आहे. ‘आमची पहिली भेट मॅक्सिकोत झाली होती. त्यावेळी मी १८ वर्षांची होती तर रिकी मार्टिन हा २२ वर्षांचा. आज माझ्या दोन मुली आहेत आणि त्याला दोन मुले. आमचा प्रवास खरोखरचं अद्भूत करणारा राहिला. Livin La Vida Loca  याचा अर्थ आहे, क्रेजी लाईफ. आपल्या आनंदासाठी शेअर करतेय, काही हसºया आठवणी...,’ असे सुश्मिताने हा फोटो शेअर करताना लिहिलेय.रिकी मार्टिन हा एक लोकप्रीय गायक, लेखक आणि अभिनेता आहे. रिकी गे आहे. सुरूवातीच्या काळात रिकी व सुश्मिता रिलेशनशिपमध्ये होते. पण हे रिलेशन फार काळ टिकले नाही. यानंतर रिकीने त्याचा गे मित्र योसेफसोबत लग्न केले. योसेफ हा पेंटर आहे. सुश्मिता एका मुलाखतीत रिकीबद्दल बोलली होती. रिकी गे आहे, हे मला ठाऊक होते. मी व रिकीने आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. या काळात आम्ही एकमेकांना जाणून घेतले. त्याने स्वत:ची ओळख मान्य केली, त्यावेळी मला त्याचा अभिमानचं जास्त वाटला. स्वत:चा डिएनए मान्य करण्यासाठी बरेच धैर्य लागते, असे ती म्हणाली होती. २००८ मध्ये रिकी सरोगेरीद्वारे दोन जुळ्या मुलांचा बाप झाला होता.

ALSO READ : ​पुन्हा चर्चेत आली सुश्मिता सेन! ट्विटरवर लिहिले, मी फक्त तुझीच...!!

रिकीनंतर आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुश्मिताचे नाव अनेकांशी जोडले गेले.  इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा  रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अकरम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले. यानंतर सुश्मिता आणि रितिक भसीन या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यात. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपची खबरही आली होती. पण यानंतर जहीर खान आणि सागरिकाच्या लग्नात सुश व रितिक एकत्र दिसले होते. 
Web Title: Sushmita Sen remembers again 'X Boyfriend'; Shared old photo !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.