सुश्मिता सेनने केले असे काही! बॉयफ्रेन्ड रोहमनही झाला थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 06:00 AM2019-02-13T06:00:00+5:302019-02-13T06:00:02+5:30

अभिनेत्री सुश्मिता सेनकडे बॉलिवूडचा एकही प्रोजेक्ट नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतच्या रिलेशनशिपमुळे सुश्मिता चर्चेत आहे. रोहमनसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्याचा सपाटा तिने लावलाय. आता रोहमनसोबतचा तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

sushmita sen with boyfriend rohman shawl before pose together |  सुश्मिता सेनने केले असे काही! बॉयफ्रेन्ड रोहमनही झाला थक्क!

 सुश्मिता सेनने केले असे काही! बॉयफ्रेन्ड रोहमनही झाला थक्क!

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे फॅशन शो, एअरपोर्ट, दिवाळी पार्टी अशा सगळ्या ठिकाणी सुश्मिता सेन  रोहमनसोबत हजेरी लावतेय.  साहजिकचं दोघांच्या लग्नाच्या चचार्ही सुरू झाल्या आहेत.

अभिनेत्री सुश्मिता सेनकडे बॉलिवूडचा एकही प्रोजेक्ट नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतच्या रिलेशनशिपमुळे सुश्मिता चर्चेत आहे. रोहमनसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्याचा सपाटा तिने लावलाय. आता रोहमनसोबतचा तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहता, सुश्मिता व रोहमन कुठल्या एका इव्हेंटमध्ये जात असल्याचे दिसतेय. याचदरम्यान  पापाराझी सुश्मिता व रोहमनला घेरतात. पण हे काय? पापाराझींना पोज देण्याआधी सुश्मिता आपली लिपस्टिक काढते आणि आरशात बघून ओठांवर लावते. कॅमेºयांसमोर सुशला अशी बेधडक लिपस्टिक लावताना पाहून रोहमनही थक्क होतो. पण सुश्मिताला जराही फरक पडत नाही. उलट लिपस्टिक लावल्यानंतर, ठीक लागलीय ना?, असे ती रोहमनला विचारते. रोहमन हसून ठीक आहे म्हणतो, तेव्हा कुठे सुश्मिता पापाराझींना पोज देण्यासाठी उभी होते. अर्थात एकटी नाही तर रोहमनसोबत... 


अलीकडे फॅशन शो, एअरपोर्ट, दिवाळी पार्टी अशा सगळ्या ठिकाणी सुश्मिता सेन  रोहमनसोबत हजेरी लावतेय.  साहजिकचं दोघांच्या लग्नाच्या चचार्ही सुरू झाल्या आहेत. दोन दत्तक मुलींची आई असलेली सुश्मिता यावर्षात रोहमनसोबत लग्न करणार असे मानले जात आहेत.

अर्थात लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सुश म्हणतेय. पण एकीकडे  लग्नाची शक्यता नाकारत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट लग्नाचे संकेत देत आहेत. अलीकडे सुश्मिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. यात पोस्टमधील फोटोत सुश्मिताच्या हातात तिच्या आईच्या लग्नातील बांगड्या दिसल्या होत्या.

Web Title: sushmita sen with boyfriend rohman shawl before pose together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.