सुश्मिता सेनने रोहमन शॉलसोबत केला साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:45 PM2019-04-27T17:45:36+5:302019-04-27T17:46:19+5:30

सुश्मिताच्या एकंदरीत वागण्यावरून ती या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार करत असल्याचा अंदाज येतोय.

Sushmita Sen And Rohman Shawl Are Officially Engaged? | सुश्मिता सेनने रोहमन शॉलसोबत केला साखरपुडा?

सुश्मिता सेनने रोहमन शॉलसोबत केला साखरपुडा?

googlenewsNext
ठळक मुद्देसुश्मिताने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या हातात एक अंगठी दिसून येत आहे. यावरूनच सुश्मिताने आणि रोहमनने साखरपुडा केला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे सुश्मिता सेन जास्त चर्चेत आहे. सध्या सुश्मिता मॉडल रोहमन शॉलला डेट करते आहे. रोहमनसोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सुश्मिताच्या एकंदरीत वागण्यावरून ती या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार करत असल्याचा अंदाज येतोय.

आता तर सुश्मिता आणि रोहमन यांनी साखरपुडा केला असल्याचे म्हटले जात आहे. सुश्मिताने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवरून त्या दोघांचा साखरपुडा झाला असल्याचा तर्क लावण्यात येत आहे. सुश्मिताने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या हातात एक अंगठी दिसून येत आहे. यावरूनच सुश्मिताने आणि रोहमनने साखरपुडा केला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने या फोटोसोबत एक छान कॅप्शन देखील दिली आहे. या फोटोवर तुम्ही साखरपुडा केला का असे प्रश्न सुश्मिताचे चाहते विचारत आहेत. तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत. 

स्पॉटबॉयने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, रोहमन आता सुश्मिताच्या घरी शिफ्ट झाला आहे. त्यांना त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, रोहमन रोज सुश्मिताच्या वांद्रे येथील घरी येत होता. सुश्मिताच्या दोन्ही मुलींसोबत त्याची चांगलीच गट्टी जमली आहे. त्यामुळे आता त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

रोहमनच्या आधी सुश्मिता रितिक भसिनला डेट करत होती. मात्र दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर एका फॅशन इव्हेंटमध्ये सुश्मिता आणि रोहमनची भेट झाली. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. गेल्या काही दिवसांत दोघे अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. रोहमनने सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले असून सगळे काही जुळून आले तर लवकरत ते दोघे लग्न करू शकतात. हेच कारण आहे की, अलीकडे सुश आणि रोहमन बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. सुश्मिता सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी रोमान्स आणि लूक्सच्या बातम्यांमुळे कायम चर्चेत असते.

Web Title: Sushmita Sen And Rohman Shawl Are Officially Engaged?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.