Sushant Singh Rajput's role as 'The Great Khali' on the big screen? | सुशांत सिंग राजपूत साकारणार मोठ्या पडद्यावर 'द ग्रेट खली'ची भूमिका ?

काही दिवसांपूर्वीच हि बातमी आली होती की सुशांत सिंग राजपूतला घेऊन एक मोठ्या स्टुडिओ बायोपिक बनवण्याचे प्लॉनिंग करते आहे. डीएनएमध्ये आलेल्या रिपोर्टनुासार द ग्रेट खलीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याची तयारी सुरु आहे. याबाबत या स्टुडिओने खलीशी त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तायर करण्याबाबत चर्चाकेली आहे आणि खलीने चित्रपट बनवण्यासाठी परवानगीदेखील दिली असल्याचे कळते आहे. यानंतर या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतला अप्रोच करण्यात आले आहे. आता सुशांत ही या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला आहे.   

रिपोर्टनुसार धोनीच्या बायोपिकमध्ये जसे धोनीच्या आयुष्याशी निगडीत काही आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या, तशा या ही चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.  जे लोकांना आतापर्यंत माहिती नाही आहेत. लोक खलीला फक्त एक रेसलर म्हणून ओळखतात. खलीच्या आयुष्याशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना महिती नाही आहेत. खली रेसलर बनायच्या आधी पंजाब पोलिसांमध्ये काम करत होता. अशा बऱ्याच गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. 

ALSO READ : View Pics : सारा अली खान अन् सुशांत सिंग राजपूत निघाले ‘केदारनाथ’च्या शूटिंगला!

सुशांत सिंग राजपूतच्या करिअरमधला हा तिसरा बायोपिक आहे. धोनीच्या बायोपिकनंतर सुशांत आणखीन एक बायोपिकमध्ये दिसणार पैरालम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पाटेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात. यानंतर सुशांत खलीच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. आता हे बघायचे आहे सुशांत या भूमिकेत स्वत:ला कसे तयार करतो आहे. ट्रेड एनालिस्टच्या नुसार धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंगचे बोलणे आणि वागणे या चित्रपटाला हिट करुन गेले. मात्र खलीची भूमिका साकारणे त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. कारण खलीची शरीरयष्ठी फार वेगळी आहे. निर्माता जो पर्यंत वीएफएक्सची मदत घेणार नाहीत तो पर्यंत हि भूमिका साकारता येणार नाही. सुशांत सिंग नाही तर बॉलिवूडचा कोणत्याच अभिनेता ही भूमिका सीजीआयच्या मदतीशिवाय साकारु शकत नाही.  

सध्या सुशांत चंदा मामा दूक के या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तो एका अंतराळवीराची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेनिंगसाठी तो नासाला जाऊन आला आहे. 
Web Title: Sushant Singh Rajput's role as 'The Great Khali' on the big screen?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.