Sushant Singh Rajput took to the creators of 'Kedarnath' Will get 'lesson' !! | ​सुशांत सिंग राजपूतने घेतला ‘केदारनाथ’च्या निर्मात्यांशी पंगा! मिळणार चांगलाच ‘धडा’!!

सध्या सुशांत सिंग राजपूत त्याच्या अ‍ॅक्टिंगमुळे कमी अन् चुकीच्या कारणांमुळे जास्त चर्चेत आहे. होय, ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या सेटवरही हेच होते आहेत.  सैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत सुशांतचे  बिनसले असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अर्थात निर्माती प्रेरणा अरोरा आणि सुशांत दोघांनीही यावर चुप्पी साधली आहे. पण कदाचित आता पे्ररणाने सुशांतवर पलटवार करण्याचे ठरवले आहे. होय, सध्याचे चित्र तरी तसेच आहे. सुशांतला ऐनकेन प्रकारे धडा शिकवण्याचा निर्धार कदाचित प्रेरणाने केला आहे.

येत्या २ मार्चला सुशांतचा ‘ड्राईव्ह’ आणि अनुष्का शर्माचा ‘परी’ हे दोन्ही चित्रपट रिलीज होत आहेत. म्हणजे, बॉक्स आॅफिसवर या दोन्ही चित्रपटाचा संघर्ष अटळ आहे. या संघर्षामागे प्रेरणाचा हात असल्याची चर्चा आहे. होय, तुम्ही वाचतायं ते खरे आहे. ‘परी’ हा चित्रपट अनुष्काचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आणि क्रिराज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होतोय आणि प्रेरणा क्रिराज एंटरटेनमेंटशी संलग्न आहे. म्हणजे, ‘परी’शी तिचा संबंध आहे. ‘पद्मावत’ची रिलीज डेट आल्याने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘अय्यारी’ची रिलीज डेट २५ जानेवारीवरून ९ फेब्रुवारी करण्यात आली. मग अनुष्का व प्रेरणाने  ‘परी’ची रिलीज डेट ९ फेबु्रवारीवरून २ मार्च केली. विशेष म्हणजे, २ मार्चला सुशांतचा ‘ड्राईव्ह’ रिलीज होणार आहे, हे माहीत असूनही पे्ररणा यांनी ‘परी’च्या रिलीजसाठी २ मार्च हीच तारीख फायनल केली. त्यामुळे ‘ड्राईव्ह’ विरूद्ध ‘परी’ हा बॉक्सआॅफिसवरचा सामना आता निश्चित आहे. चर्चा खरी मानाल तर प्रेरणाने केवळ आणि केवळ सुशांतला धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता सुशांत यातून कसा मार्ग काढतो आणि पुढे हा संघर्ष कसा रंगतो की सामनाच रद्द होतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

ALSO READ : ​‘केदारनाथ’च्या टीममध्ये धुसफूस! सारा अली खानच्या चिंतेत भर!!

‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे.  
Web Title: Sushant Singh Rajput took to the creators of 'Kedarnath' Will get 'lesson' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.