Sushant Singh Rajput and Parineeti Chopra's 'Takadum' is delayed? | सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्राच्या ‘ताकादुम’ ला का होतोय उशीर?

‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याची उत्कृष्ट भूमिका केली आहे. धोनीची बायोपिक असलेल्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी देखील त्याच्या अभिनयाचे सोशल मीडियावर कौतुक केले होते. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय ते म्हणजे ‘चंदामामा दूर के’ या चित्रपटामुळे. यात तो अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या व्यक्तीरेखेसाठी खास ट्रेनिंग घेतो आहे. हे आम्ही नाही तर स्वत: सुशांतने केलेल्या टिवटवरून कळतेय. या पोस्टमध्ये सुशांत ‘बोर्इंग ७३७’ या विमानात बसलेला दिसतोय. पण, या चित्रपटामुळे त्याच्या ‘ताकादुम’ चित्रपटाला उशीर होत असल्याचे कळतेय.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘चंदामामा दुर के या चित्रपटासाठी सुशांतने खास मेहनत घ्यायचे ठरवल्याने तो ट्रेनिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या ‘ताकादुम’च्या शूटिंगला उशीर होईल. या चित्रपटात तो परिणीती चोप्रासोबत दिसणार आहे. आता लवकरच सुशांत ‘राब्ता’ चित्रपटाचे प्रमोशनही सुरू करणार आहे. चित्रपटाच्या बाबतीत तो फारच परफेक्शनिस्ट आहे. एकावेळी एकच चित्रपट साकारणे पसंत करतो. ‘चंदामामा’ हा एक बिग बजेट चित्रपट असून सुशांतला या चित्रपटासाठी त्याचा संपूर्ण वेळ देण्याची इच्छा आहे. तसेच परिणीती देखील ‘गोलमाल ४’ या चित्रपटामध्ये बिझी आहे. इरफान खान ‘ताकादुम’ मध्ये सुशांतच्या गुरूची भूमिका करणार असून तो सध्या त्याचा ‘हिंदी मीडियम’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. तो लवकरच तनुजा चंद्रा यांच्या ‘रोड ट्रिप’ चित्रपटामध्ये बिझी होणार आहे. 

होमी अदजानिया यांचा ‘ताकादुम’ हा चित्रपट सुशांतसिंग राजपूतने बºयाच दिवसांपासून साईन केलेला आहे. दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर चित्रपटाचे शूटिंग आतापर्यंत सुरू व्हायला हवे होते. मात्र, परिणीती देखील ‘गोलमाल ४’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने शूटिंगसंदर्भात कुठलीच हालचाल दिसून येत नाहीये. 

Web Title: Sushant Singh Rajput and Parineeti Chopra's 'Takadum' is delayed?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.