surveen chawla announces her pregnancy with this adorable post | ‘हेट स्टोरी2’ची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री बनणार आई!
‘हेट स्टोरी2’ची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री बनणार आई!

अभिनेत्री नेहा धूपिया लवकरच आई बनणार आहे. आता ‘हेट स्टोरी2’ची बोल्ड अभिनेत्री सुरवीन चावला हिने आई बनणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय, सुरवीनने दोन वर्षांपर्यंत आपल्या लग्नाची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. अगदी अलीकडे तिने गौप्यस्फोट करत, आपण दोन वर्षांपासून विवाहित असल्याचा खुलासा केला होता. आता दिवाळीच्या मुहूर्तावर तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमीही शेअर केली आहे.
सुरवीनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुरवीन व तिच्या नवºयाच्या फोटो फ्रेमच्या समोर छोट्या बाळाचे जोडे ठेवलेले दिसत आहेत. या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये सुरवीनने प्रेग्नंसी कन्फर्म केली आहे. ‘एक चमत्कार होणार आहे, या चमत्काराला जीवन म्हणतात. माझ्या आत एक जीव वाढतोय,’ असे तिने लिहिले आहे.

तूर्तास सुरवीन जरासी नर्व्हस होती. पण आता ती बाळाच्या आगमनासाठी आतूर आहे. आधी मी खूप नर्व्हस होते. पण आता मी या रोमांचक प्रवासासाठी तयार आहे. किती महिला खºया बोलतात मला माहित नाही. पण माझ्यामते, आई बनण्याची प्रक्रिया खूप संथ आहे. माझ्यासाठी मातृत्व एक अनुभव आहे, जो आतूर येतो, असे सुरवीनने म्हटले आहे.
सुरवीनने २८ जुलै २०१५ मध्ये इटलीच्या अक्षय ठक्कर नामक उद्योगपतीशी लग्न केले. ३४ वर्षीय सुरवीन बॉलिवूडसोबत पंजाबी व साऊथ चित्रपटात अ‍ॅक्टिव्ह आहे. अगदी अलीकडे ‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये दिसली होती. पार्च्ड चित्रपटातही ती होती.


Web Title: surveen chawla announces her pregnancy with this adorable post
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.