The superstar actor refused to work in Karan Johar's second consecutive film | सलग दुसऱ्यांदा करण जोहरच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला या सुपरस्टार अभिनेत्यानं

बाहुबली फेम प्रभासचे शेड्यूल फारच व्यस्त आहे. त्याच्याकडे करण जोहरसोबत काम करायला सध्या वेळ नाही. प्रभास त्या अभिनेत्यांच्या लिस्टमधला आहे जो चित्रपट मिळवण्यासाठी निर्मात्यांच्या मागे पळत नाहीत. याच कारणामुळे त्याने दुसऱ्यांदा करण जोहरच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर नाकारली आहे. प्रभासने सांगितेल आता वेळ नाहीय, पुन्हा कधी तरी तुझ्यासोबत काम करण्याबाबत विचार करेन.  

याआधी प्रभासने करण जोहरची ऑफर धुडकावली होती. ‘बाहुबली2’ सुपरडुपर हिट झालेला पाहून करण जोहर दिग्दर्शक एस. एस. राजमौलीला सोबत घेऊन प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार अशी बातमी आली होती. करण जोहर प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यास अगदी तयार होता. त्याने याबद्दल  प्रभाससोबत चर्चाही केली होती. पण प्रभासने म्हणे, या प्रोजेक्टसाठी २० कोटी रूपयांची मागणी केली. ही रक्कम ऐकून करण जोहरची बोलतीच बंद झाली.  यानंतर करणने म्हणे प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा इरादाच सोडून दिला. 

सध्या प्रभास 'साहो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. साहोची शूटिंग आबू धाबीमध्ये सुरु आहे. हा बिगबजेट चित्रपट आहे जवळपास 150 कोटींचे याचे बजेट आहे. चित्रपटात प्रभास जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. यात नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी आणि जॅकी श्रॉफ व्हिलेनच्या भूमिका साकारणार आहेत. 'साहो’मध्ये  श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे. . प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे.  सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’मध्ये स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील.

ALSO RAED :  ​अचानकच प्रभासच्या ‘साहो’च्या सेटवर पोहोचली अनुष्का शेट्टी; म्हटले, ‘थोडं जपून’!

Web Title: The superstar actor refused to work in Karan Johar's second consecutive film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.